नवीन लेखन...

योगा-योग ( काल्पनिक दीर्घ कथा )

विजय त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात व्यस्त होता इतक्यात दरवाजा ह्ळूच आता ढकळत प्रतिभा गोड आवाजात म्ह्णाली ‘मे आय कम इन सर !’’ तिचा गोड आवाज ऐकुण विजयने लॅपटॉपमधे खुपसलेले आपले डोके वर काढले आणि डोळे वर करून प्रतिभाकडे पाहात म्ह्णाला, प्लीज कम इन! प्रतिभा त्याच्या टेबला जवळ येताच त्याला म्ह्णाली, ‘ बाहेर तुमचे बाबा आलेत तुंम्हाला भेटायला ! ते ऐकताच चेहरा निर्विकार करून विजय प्रतिभाला म्ह्णाला,’ त्यांना बाहेरच थांबव माझं काम आटाल्‍ की तुला सांगतो मग पाठव त्यांना आत. त्यावर प्रतिभा आश्चर्याने म्ह्णाले पण्‍ सर ते तुमचे बाबा आहेत ? त्यावर विजय किंचिंत रागावून तिला म्ह्णाला, तुला सांगितलं तेवढ कर ते येथे त्यांच्या मुलाला भेटायला नाही आलेत ते भेटायला आलेत उद्योगपती विजय मराठेला, तू जा आणि त्यांना काही चहापाणी हवं काय ते विचार आणि मी फोन केला की त्यांना आत पाठव ! त्यावर प्रतिभा ओके सर ! म्ह्णत दरवाजा ओढून घेत बाहेर गेली. बाहेर चारही बाजुला नजर फिरवून सोफ्यावर शांत बसलेले विजयच्या बाबांच्या जवळ जात प्रतिभा म्ह्णाली,बाबा सर जरा कामात आहेत थोड्या वेळाने कामे आटपली की तुंम्हाला भेटतील तोपर्यंत तुंम्ही काय घेणार चहा कॉफी त्यावर विजयचे बाबा चहा म्ह्णताच प्रतिभाने मनिषाला हाक मारली आणि बाबांसाठी चहा आणि नाष्टा आणायला सांगितला. प्रतिभा फोन जवळच सोफ्यावर बाबांपासून काही अंतरावर बसली, काही तरी बोलावं म्ह्णून बाबा प्रतिभाला म्हणाले, मुली तुझं नाव काय ? त्यावर प्रतिभा गोड आवाजात प्रतिभा म्ह्णाल्यावर बाबा म्ह्णाले प्रतिभा छान नाव आहे येथे किती वर्षे काम करतेयस ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली, गेली चार वर्षे ! तुझे साहेब फार रागवत नाहीत ना ? त्यावर प्रतिभाने मानेनेच नकार दिल्यावर म्ह्णजे रागावतात, साक्षात जमद्ग्नीचा आवतार आहे तो, बरीच वर्षे प्रत्यक्ष भेटला नाही म्ह्णून भेटायला आलो तर तो आता इतका मोठा झालाय की प्रत्यक्ष जन्मदात्या बापालाही भेटण्यासाठी वाट पाहायला लावतोय. ते गाळात गोड ह्सत म्ह्णाले. त्यावर प्रतिभा काहीतर बोलणार इतक्यात मनिषा चहा- नाष्ता घेऊन आली आणि समोरच्या टेबलावर टेवून चटकण निघून गेली. प्रतिभाने स्वतः चहाचा कप बाबांच्या हातात दिल्यावर त्यांनी प्रतिभालाही चहा घेण्याची विनंती केली. चहा पिता समोरच्या भिंतीवरील कचेच्या कपाटातील शेकडो पुस्तके पाहात बाबा प्रतिभाला म्ह्णाले ही पुस्तके कोण वाचतो ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली सर वाचतात कधी- कधी संदर्भासाठी त्यावर बाबा म्ह्णाले विजय उद्योगपती नसता झाला तर या पुस्तकात त्याचीही दहा – बारा पुस्तके नक्की असती. त्यावर प्रतिभा ती कशी म्ह्णताच बाबा आश्चर्याने म्ह्णाले म्ह्णजे तुला माहीत नाही का ? तुझा जमदग्नी असणारा बॉस चांगला कवी, लेखकही आहे ते ? कित्येक दिवाळी अंकात त्याचे लेख, कथा आणि कविता प्रकाशित झालेल्या आहेत. मी त्याला त्याचे लिखाण थांबवून इतर उद्योग करायला सांगितले म्ह्णून त्याचा माझ्यावर राग आहे. उद्योगपती म्ह्णून तो यशस्वी होणार याची मला खात्री होती कारण माझ्या सोबत त्याने अनेक छोटे- मोठे उद्योग केले होते ज्यात कधीच आंम्हाला तोटा झालेला नव्हता पण त्याने लेखक आणि कवी होण्याच मनावर घेतला आणि त्याचे भिकेचे डोहाळे सुरू झाले माझा राजासारखा राहणारा मुलगा कंगाल मानसासारखं जीवन जगू लागला मला ते पाहावल नाही कारण मला त्याला फक्त आणि फक्त राजासारखं जगताना पाहायचं होत जस आता जगतोय ! तो लेखक म्ह्णूनही यशस्वी झालाच असता पण कदाचित आज त्याच्याकडे जे काही आहे ते नसत. मी त्याला साहित्यापासून दूर केला आणि तो सर्वांपासून दूर झाला अगदी जवळ मानसांपासूनही पूर्वीही दिवस-रात्र खपायचा आणि आजही दिवस-रात्र खपतोय फक्त पूर्वी त्याला त्या खपण्यातून आनंद मिळायचा जो आता मिळत नाही. आता मिळतोय तो फक्त पैसा ! इतक सगळ मिळवूनही तो सुखी – समाधानी नाही. प्रतिभा तुला काय वाटत ? तुझे सर लग्न करतील की नाही ? त्यावर प्रतिभा किंचित संकोचून म्ह्णाली,’ त्यावर मी भाष्य नाही करू शकत कारण आमच्यात खाजगी विषयावर आजिबातच बोलण होत नाही आणि सरांना ते आवडतही नाही. तू का नाही अजून लग्न केलस ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली माझ्या विधवा आईची आणि माझ्या तीन लहान बहिणींची जबाबदारी आहे माझ्यावर त्या जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत. त्यावर बाबा म्हणाले ती स्वयंपाकीन काय तिच नाव हां ! मनिषा तिला यापूर्वीही कोठेतरी पाहिल्यासारखं वाटतय तुम्ही दोघी दिवसभर त्याच्या सोबत असता पण रात्रीच्या जेवनाचं वगैरे काय करतो त्यावर प्रतिभा म्हणाली सर सहसा बाहेरच काही खात नाही मनिषा त्यांचा रात्रीचा स्वयंपाकही बनवून जाते. अग! पण तुझ्या सरांना आपली माणसे सोडून असं एकाकी राहाण्याची काही गरज आहे का ? लग्न कर सांगतो तर ते ही ऐकत नाही,म्ह्णतो मला लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर घालायची नाही. मला सांग त्याच्या एक – दोन पोरांनी असा देशाच्या लोकसंख्येत काय फरक पडणार आहे ? त्यावर प्रतिभा म्हणाली ,’’माफ करा बाबा पण तुमच्या या मताशी मी सहमत नाही सरांसारखा जर प्रत्येकाने देशाचा देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता तर आज आपला भारत देश प्रगत राष्ट्र असता. माझ्या बाबांनी नाही का मुलाच्या हव्यासापोठी आम्हा चार मुलींना जन्म दिला आणि स्वतः गेले वर माझ्या स्वप्नांची राखरांगोळी करून. त्यावर थोडावेळ विचार करून बाबा म्हणाले तू म्हणतेयस त्यात तथ्य आहे विजयने नुसत लग्न केलं आणि मुलांना जन्माला नाही घातलं तरी चालेल मला त्यावर प्रतिभा काही तरी बोलणार इतक्यात फोन खणखणला विजयने फोनवर प्रतिभाला बाबांना आत पाठवायला सांगितले आणि ते आत असेपर्यंत आत आणखी कोणाला न पाठविण्याची सुचनाही दिली. प्रतिभा बाबांना सरांनी तुंम्हाला आत बोलावलयं म्ह्णताच बाबा विजयच्या कॅबिनच्या दिशने गेले विजय त्यांची वाट पाहात दारातच उभा होता ते दारात पोहचता त्यांना खुर्चीत बसायला सांगितले ते बसल्यावर तो त्याच्या खुर्चित बसला. विजयच्या कॅबिनमध्येही बरीच पुस्तके होती काही प्रमाणपत्रे आणि स्मृतीचिन्हे ही होती पण ती सारी उद्योगाशी संबंधीत होती. विजयला साहित्यीक म्ह्णून मिळालेल्या प्रमाणपत्रांचा आणि स्मृती चिन्हांचा त्यात समावेश नव्हता. ते पाहून बाबा विजयला म्ह्णाले तुझ्या कवितांना आणि कथांना मिळालेल्या प्रमाणपत्रांचा आणि स्मृतीचिन्हे येथे दिसत नाहीत त्यावर विजय किंचित रागातच म्हणाला, हे ऑफीस विजय मराठे नावाच्या साहित्यीकाच नाही तर विजय मराठे या उद्योगपतीच आहे. माझ्यातील साह्त्यीक त्या दिवशीच मेला ज्या दिवशी मी मनाशी फक्त आणि फक्त रोजच्या तुमच्या टोमन्याला वैतागून उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. म्ह्णजे माझ्यावरचा तुझा राग अजून शांत झालेला नाही. त्यावर विजय म्हणाला, नाही तो कधीच शांत होणार नाही, मला स्वतःसाठी नाही तर समाजासाठी देशासाठी जगायचं होत काही तरी भरीव कार्य करायच होत पण तुंम्ही माझी किंमत पैशात केलीत तेंव्हा माझा नाईलाज झाला एक बेवडा आणि एक लेखक यांचीही तुलना होऊ शकते हे तुमच्यामुळेच मला कळंल आणि त्याक्षणी मी पैशाने माझी किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला. आता कशाला रडताय तुमचं स्वप्न पूर्ण झाल ना ? माझ्या स्वप्नांची राकरांगोळी झाली म्हणून काय झालं ? त्यावर बाबा विजयला म्ह्णाले माझा तुझ्या स्वप्नांना कधीच विरोध नव्हता पण सध्याच्या स्वार्थी जगात पैशा अभावी तुझ्यावर कोणते संकट ओढावू नये असं मला वाटतं होत आज तू जितका श्रीमंत झाला आहेस तितका श्रीमंत तू व्हावास हे मला अपेक्षित नव्हत. पहिला तू लिखाणाच्या मागे वेडा झाला होतास आता पैशाच्या मागे वेडा झालेला आहेस. मला जे अपेक्षित होत ते झालेलं नाहीस तू संसारात रमावास असं मला वाटत होत पण तू कालही संन्याशी होतास आणि आजही संन्याशीच आहेस. बाबांचे बोलणै मधेच थांबवत विजय म्हणाला ते जाऊदे ! आज तुंम्ही मला भेटायला येथे का आलात जे काही होत ते फोनवरच बोलायच ना उगाच तसदी कशाला घ्यायची त्यावर बाबा म्हणाले येथे जवळ्च एक काम होते म्ह्टल तुझ ऑफीस येथून जवळच आहे तर भेटूनच जाऊया पत्ता नव्हता माझ्याकडे म्ह्णून अजयला फोन केला त्याने दिला फोनवरच आता रमेशकडे जाणार आहे तेथून कविताकडेही जाणार आहे बरेच दिवस झाले विशालला पाहिले नाही आणि आता त्याचा वाढदिवसही जवळ आला आहे ना ? तुझी आई तुझी सारखी आठवण काढत असते एकदा वेळ काढून गावी येऊन तिला प्रत्यक्ष भेटून जा ! त्यावर विजय म्हणाला आता काय प्रत्यक्ष भेटायचं रोजच तर आंम्ही पाहतो एकमेकांना फोनवर त्यावर बाबा म्ह्णाले हो ! या फोनमुळे माणसे जवळ आली पण त्यांची मने मात्र लांब गेली… आता मला खरंच वाटतय तू लेखक होतास तेच बर होत निदान तेंव्हा तू मनाने विचार करायचास पण आता तू डोक्याने विचार करतोस आणि तुझ्या खर्च होणार्‍या मिनिटाचा पैशात हिशोब ठेवतोस. बाप म्हणून तुला काही सांगण्याचा अधिकार मला आहे की नाही मला माहित नाही तरीही ऐक आता एकदातरी मागे वळून बघ माझ्यासाठी नाही तुझ्या आनंदासाठी… चल मी निघतो कधी जमल आणि गावी येणार असशील तर कळव. आता सरळ रमेशकडे जाणार आहे आणि चार-पाच दिवसांनी गावी जायच म्ह्णतोय त्यावर विजय म्ह्णाला, थांबा मी प्रतिभाला सांगतो ड्रायव्हर सोडेल तुंम्हाला गाडीने अजयच्या घरी… त्याने तेथूनच प्रतिभाला फोन करून सांगितले प्रतिभा थोड्यावेळाने आत येऊन म्ह्णाली गाडी तयार आहे बाबा प्रतिभासोबत बाहेर गेले वाटेत ते प्रतिभाला म्हणाले तुझा साहेब कधी आंम्हाला भेटायला गावी आलाच तर तुही ये त्याच्या सोबत शक्य झालं तर त्यावर मानेनेच होकार देत प्रतिभा गोड हसली. बाबा निघून गेल्यावर प्रतिभा विजयच्या कॅबीन मधे गेली आणि विजयला म्हणाली, बाबा गेले हा! ड्रायव्हर सोबत सर तुमचे बाबा फारच गोड आहेत त्यावर विजय म्हणाला, हो जगासाठी ते गोडच आहेत पण माझ्यासाठी मात्र ते कडू कारलं आहेत माझं सार आयुष्य कडू करून सोडणार. त्यावर प्रतिभा म्हणाली, सर आज तुंम्हाला काय कमी आहे म्ह्णून तुंम्ही त्याच्यावर रागावलात त्यावर विजय म्ह्णाला, प्रतिभा ते तुला नाही कळणार… त्यावर प्रतिभा किंचित उत्साहात म्हणाली सर… बाबा म्हणत होते की तुंम्हीपूर्वी लेख कथा आणि कविताही लिहायचात माझा तर माझ्या कानावर विश्वास बसला नाही तुमच्यासारखा जमद…सॉरी रागीट माणूस कविताही लिहू शकतो हे मला तर अजूनही खरं वाटत नाही. ते ऐकुन विजयने आपल्या समोरच्या टेबलाच्या खणात हात टाकला आणि एक पुस्तक बाहेर काढल आणि ते प्रतिभाच्या हातात दिले. प्रतिभाने ते पुस्तक आश्चर्याने पाहिले तर तो एक कवितासंग्रह होतो त्या कवितासंणग्रहाचे नाव होते प्रतिभा आणि त्या पुस्तकाचा कवी होता विजय मराठे ते पुस्तक पाहात प्रतिभा म्ह्णाली मी हा कवितासंग्रह घरी घेऊन जाऊ का ? त्यावर विजय म्ह्णाला, हो तुलाच वाचण्यासाठी दिलाय तुला खरं वाटत नाही ना की मी कविताही लिहू शकतो हे ! पण सर ही प्रतिभा कोण आहे ? त्यावर विजय म्हणाला, फालतू प्रश्न विचारू नकोस, पण एक लक्षात ठेव तुझ नाव फक्त प्रतिभा होत म्ह्णून मी तुला माझ्याकडे कामाला ठेवल नाहीतर कदाचित ठेवलही नसत त्यावर प्रतिभा काहीच न बोलता रागाने निघून गेल्यावर मनिषा विजयच्या कॅबीनमध्ये चहा आणि नाष्टा घेऊन आली असता विजयने तिच्याकडे तिच्या मुलांची चौकशी केली आणि प्रतिभा गेली का घरी म्ह्णून चौकशी केली त्यावर मनिषा म्ह्णाली प्रतिभा आताच गेली जर रागात दिसत होती तू काही म्ह्णालास का साहेबा तिला ? त्यावर विजय म्ह्णाला छे ! ग ! माझा कवितासंग्रह तिला वाचायला दिला त्यावरच प्रतिभा नाव पाहून मला प्रश्न विचारला तर मी तिला म्ह्णाला तुझा नाव प्रतिभा आहे म्ह्णूनच मी तुला कामाला ठेवल त्याचा राग आला असेल कदाचित तसही मी ठरवूनही तिच्यावर रागावू शकत नाही कारण ती फारच गोड आहे कवितासारखी ! ती फारच साधी-भोळी आहे, तिच्या बोलण्यात जराही कृत्रीमता जाणवत नाही, तिच्या मनात जे असते तेच तिच्या चेहर्‍यावर दिसते तिचा चेहरा वाचायला फारच सोप्पा आहे अशा मानसांचा काही लोक गैरफायदा उचलतात. ती आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे त्या व्यतिरीक्त ती बाकीच्या गोष्टीत कधीच नाक खुपसत नाही. चार वर्षात तिला तू येथे स्वयंपाकीन म्ह्णून काम करतेस हे माहीत आहे पण तू माझी मैत्रीण आहेस हे अजूनही माहीत नाही. मझ्या खाजगी आयुष्याबद्दल ती कधीच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल कधीच काही सांगत नाही आज बाबा आचानक आले आणि तिच्या डोक्यात नको नको ते भरून गेले त्यांनी तुला ओळखल नाही ना ? त्यावर मनिषा म्ह्णाली, ओळखल असत पण मीच त्यांच्यासमोर फारकाळ उभी राहीलेच नाही. उगाच तुझ्या लग्नाची जबाबदारी ते माझ्या खांदयावर टाकायचे ! त्यावर विजय म्ह्णाला ते ही खरं आहे, बाबांना वाटत की मी आता बदललोय माझ्यातीला माणूस हरवून बसलोय ? त्यावर मनिषा म्ह्णाली मला तस नाही वाटत कारण मी न मागता ही तुला मला कितीतरी मदत केली आहेस इतकेच काय आपल्या कंपनीतही तू कित्येकांना न सांगता न मागता मदत केली आहेस. प्रतिभालाही तू किती सांभाळून घेतोस तिच्या चुका तू स्वतः सुधारल्यास पण तिला कधी एका शब्दाने बोलला नाहीस. पण आता प्रतिभा कामात फारच तरबेज झाली तुझ्या गैरहजेरीत पण ती सार सांभाळते. त्यावर विजय म्ह्णाला मी मुद्दमच बाबांना येथे थांबायला सांगितल नाही कारण त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाहीत माझ्याकडे म्ह्णूनच इतके वर्षे मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचेही टाळत होतो. मला जे जे मिळवायच होत ते सार मी मिळवल पण आता या सार्‍यातही माझ मन रमेनास झालय. मी आता इतका मोठा झालोय की आता मला मनात असूनही लहानही होता येत नाही. तुझ्या मनातील माझी प्रतिमा आणि प्रतिभाच्या मनातील माझी प्रतिमा यात कमालीच अंतर आहे. तू माझ्यातील कवीला भेटली जो सतत कशाच्या तरी कोणाच्यातरी प्रेमात पडत होता आणि प्रतिभा माझ्यातील उद्योगपतीला भेटली आहे जो सतत पैशाच्या जोरावर काहीतरी मिळविण्यात गुंग असतो. तुझ्या नजरेत मी रसिक तर प्रतिभाच्या नजरेत अरसिक आणि रुक्ष आहे. ते जाऊदे रात्री जेवनात काया केल आहेस ? त्यावर मनिषा म्ह्णाली, भेंड्याचे भरीत केले आहे तुझ्या आवडीचे त्यावर विजय म्ह्णाला, तू जर मला पुन्हा भेटली नसतीस तर माझं काय झाल असतं त्या देवालाच ठाऊक. माझं ऑफीस घरातच आहे म्ह्णून बर… नाहीतर मला असं हवं तेंव्हा हव ते खायला प्यायला मिळालं असत का ? बर ! आता उशिर झालाय तू घरी जा नाहीतर तुझा नवरा आणि सासू माझ्या नावाने बोंबा मारायचे त्यावर गोड ह्सून मनिषा निघून गेल्यावर विजय आपल्या कॅबीनमधून बाहेर पडला आणि ताजातवाना होऊन हॉलमध्ये टी.व्ही समार जाऊन बसला त्याच्या आवडती मालिका पाहात विजय मालिका फक्त एकटा असताना पाहातो कारण कोणी त्याच्यावर हसू नये म्ह्णून त्याच हे गुपित फक्त घराच्या पाहरेदाराला आणि ड्रायव्हरला माहीत होत कारण ते दोघेच तर त्याचे रात्रीचे सोबती होते. रात्री ड्रायव्हर आणि पाहरेकरी त्याच्या हॉलमध्येच झोपत असत. त्या तिघांनी मिळून बर्‍याच पाटर्या झोडल्या होत्या घरातल्या घरात पण कोरड्या ओल्या नाहीत कधी-कधी त्यांच्या जोडीला विजयचे काही मित्रही असत त्यांच्या बायका माहेरी गेल्या की. रात्री उशिरा जेवून विजय त्याच्या बेडरूमधे झोपायला जात असे. विजयच्या बेडरूमधे जाण्याची परवानगी फक्त मनिषालाच होती. त्याच्या बेडरूमच्या भिंती सकाळी बाबांनी चौकशी केलेल्या प्रमाणपत्रांनी आणि स्मृतीचिन्हांनी भरलेली होती त्याने आता पर्यत लिहलेल्या कविता लेख आणि कथांची कात्रणे तिथे फ्रेम करून लावलेली होती. त्याची प्रकाशित पुस्तके तिथे व्यवस्थित मांडलेली होती. साहित्यीक म्ह्णून त्याने इतर मोठ-मोठ्या साहित्यीकांसोबत काढलेली छायाचित्रे छान फ्रेम करून लावलेली होती. मागली कित्येक वर्षात विजयने एक शब्दही लिहला नव्हता पण त्याने त्याचे वाचन मात्र थांबविले नव्हते. कित्येकदा तर तो वेड्यासारखे स्वतःचेच साहित्य पुन्हा पुन्हा वाचत बसत असे. वाचनाशिवाय तर तो जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हता. त्याच्या बाबांच्या घरात विजयच्या साहित्याला हक्काची जागा नव्हती ती जागा मिळविण्यासाठी विजयने त्याच्या आयुष्यातील कित्येक वर्षांची किंमत मोजली होती. आज विजयला पैशामुळे मिळणारा मान – सन्मान मिळत होता पण विजयला साहित्यीक म्हणून मिळणारा मान – सन्मान हवा होता. पण तरीही साहित्याला पूर्णपने वाहिलेल्या साहित्यीकांच्या कामी येत होता याचा फार आनंद होत होता. आता विजय टी.व्ही. वर त्याच्या आवडीच्या मालिका निवांत पाहू शकत होता पण पूर्वी त्याच्या बाबांना आवडत नाहीत म्ह्णून त्यांना मालिका पाहाता येत नसत. खरं म्ह्णजे एखादी मालिका लिहण्याचे त्याचे स्वप्न होत पण ते अपूर्णच राहील. विजयच्या मनात त्याच्या बाबांबद्दल प्रचंड तिरस्कार होता कारण त्यांनी जाणते अजाणतेपणी त्याच्या अनेक स्वप्नांना सुरुंग लावला होता आणि काही स्वप्नांना विजयने स्वतः आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरुंग लावून घेतला होता. आता विजयच्या बाबांना विजयच्या एकाकी जगण्याची काळजी वाटत होती पण हे एकाकी जीवन जगण हेच तर विजयच स्वप्न होत. आता तो एका अलिशान शांत घरात एकटाच राहात होता हेच तर त्याच्या स्वप्नातील घर होत. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगता यायला हवं त्याला जे वाटेल ते त्याला करता यायला हवं, आपल्या आयुष्याचा चांगला- वाईट प्रत्येक निर्णय स्वतःघ्यायला हवा. स्वतंत्र्य देशात खर्‍या अर्थाने प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगता यायला हवे. म्ह्णूनच प्राणी पक्षी पालणारी लोक विजयच्या डोक्यात जातात. इतकेच नव्हे तर मानसाने मानसांना स्वतःत गुंतवून ठेवणेही त्याला आवडत नाही. हेच कारण होत ज्यामुळे विजय लग्न करण टाळत होता. त्याला कोणावरही कोणतच नातं लादायच नव्हत. मनिषाही फक्त गरज म्ह्णून त्याच्याकडे काम करत नव्हती तर ती ही कधीकाळी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. ती जर अशिक्षीत नसती तर कदाचित ती विजयच्या प्रेयसीची जागा घेऊ ही शकली असती. त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री त्याच्या प्रेमात पडलीच होती. पण विजय नेहमीच जाणुनबुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आला. विजयला कधीच सुंदर दिसणारी रेखीव वैगरे प्रेयसी नकोच होती. त्याला त्याच्यावर नव्हे तर त्याच्या साहित्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती.

एके दिवशी प्रतिभा विजयच्या कॅबीनमध्ये आल्यावर आज त्याचा मुड चांगला आहे पाहून म्हणाली सर ! तुमच्या कविता फारच सुंदर आहेत माझ्या तिन्ही बहिणींना फारच आवडल्या. तिन्ही बहिणींना हा उल्लेख ऐकताच विजयचे कान टवकारले काय तिन्ही बहिणींना म्ह्णजे तुला तीन बहिणी आहेत कधी म्ह्णाली नाहीस त्यावर प्रतिभा म्ह्णाली नाही ते सांगण्याची कधी वेळच आली नाही. मग ! उगाच तुंम्हाला सांगण्याच काही कारणच नव्हत ना ? त्यावर आणखी कोण कोण आहे तुझ्या घरी ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली मी, माझी आई आणि माझ्या तीन लहान बहिणी तुझे वडिल ते वारले पाच वर्षापूर्वी मग कुटुंबाची सारी जबाबदारी कोण सांभाळतो ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली, मिच सांभाळते आई आणि बहिणीही त्यांच्या परीने हातभार लावतात त्यांना जमेल तसा. एकदा का माझ्या बहिणी मार्गी लागल्या की मोकळी ! त्यावर विजय म्ह्णाला, या भ्रमाता राहू नकोस ! या सगळ्यात तुझं आयुष्य संपेल पण तू त्यातून मोकळी होणार नाहीस आणि तू ज्यांच्यासाठी इतका त्याग केलास तेच तुला प्रश्न विचारतील तुला इतका त्याग कोणी करायला सांगितला ? तुझ्या जीवावर तुझ्या बहिणी त्यांच्या आवडता पुरुषाचा हात पकडून जेंव्हा निघून जातील तेंव्हा तुझी आईच तुला म्ह्णेल तू ही एखाद्याचा हात धरून जायच होत ना तुला कोणी आडवल होत ? तेंव्हा तू स्वतःच्या मुर्खपणाला दोष देशील माझ्या साराखा. मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या प्रत्येक सुखाचा त्याग केला आणि एका क्षणाला तो माझा मुर्खपणा होता हे माझ्या लक्षात आले. तेंव्हा मी माझी स्वप्ने, माझ्या आवडी सारे गुंडाळून हा आजचा उद्योजक विजय मराठे जन्माला घातला ज्याला तू जमद्ग्नी म्ह्णतेस ! त्यावर प्रतिभा म्ह्णाली, पण ! सर तुंम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली नाहीत ना मी ही करणार नाही मग त्याचे परिणाम काही ही होवोत.बर ! सर तुमच्या आज चार मिटींग आहेत त्यावर विजय म्ह्णाला, आजच्या मिटींग संपवून मी माघारी येईपर्यंत तू ऑफीसमध्येच थांब मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा करायचेय. संध्याकाळी विजयला यायला तासभर उशीरच झाला. प्रतिभाच्या त्याची वाट पाहात विजयच्या कॅबीनमध्येच काम करत बसली होती. विजयही घाईघाईतस कॅबीनमध्ये आला प्रतिभाशी जुजबी चर्चा केल्यावर मनिषाना चहा नाष्ता आणायला सांगितल मनिषा नाष्ता घेऊन आल्यावर विजने तिलाही घरी जायला सांगितले आणि प्रतिभासह चहा पिता- पिता प्रतिभाला म्हणाला आज घरी जायला उशीर झाला तर आई काळजी करेल ना ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली नाही करणार मी मगाशीच फोन करून सांगितल की मला यायला उशिर होईल म्ह्णून. थोड्या वेळाने प्रतिभा जायला निघताच विजय तिला म्हणाला,’ प्रतिभा थांब मी सोडतो तुला गाडीने मी तिकडेच चाललोय. त्यावर प्रतिभा म्ह्णाली नको सर मी जाईन रिक्षाने उगाच तुंम्हाला त्रास कशाला त्यावर विजय म्ह्णाला, मला कसला त्रास मला तुला उचलून थोडीच घ्यायचय ! विजयचे हे शब्द ऐकुण प्रतिभा किंचित बावरलीच पण तिने स्वतःला सावरल. गाडीत प्रवासात प्रतिभा आणि विजय एकमेकांशी अवक्षरही बोलले नाहीत. ड्रायव्हरला प्रतिभाच घर माहित होत त्यामुळे त्याने प्रतिभाच्या घराजवळच काही अंतरावर गाडी थांबवली प्रतिभा गाडीतून उतरल्यावर विजयही गाडीतून खाली उतरला सहज औपचारीकता म्ह्णून ती विजयला म्ह्णाली सर ! या ना घरी ! प्रतिभाचे हे वाक्य ऐकताच विजय तिच्यासोबत खरंच निघाल्यावर मात्र प्रतिभाला फक्त भोवळ येण्याचीच बाकी होती कारण विजयसारखा माणूस तिच्यासोबत तिच्या घरी यायला तयार होईल हे तिला अपेक्षितच नव्हते. आता विजयसोबत चालताना प्रतिभा देवाकडे एकच प्रार्थना करत होती की घरी सर्व ठिक – ठाक असावं बहुदा ते नसणारच याची प्रतिभाला खात्री होती. प्रतिभा विजयसह तिच्या घराच्या दाराजवळ येताच आतून तिच्या बहीणीचे प्रेमळ भांडणाचे आवाज येत होते. प्रतिभाने दरवाजा ठोठावला असता प्रतिभाची सर्वात लहान बहिणीने दरवाजा उगडला प्रतिभा सोबत सुटाबुटातला पुरुष पाहून क्षणभर ती डचकली. त्यांना दारात पाहाताच प्रतिभाच्या इतर दोना बहिणींनी पटापट घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाची आवरा आवर करायाला घेतली. विजयकडे पाहात प्रतिभा म्ह्णाली सर ! या ना आत ! प्रतिभाने विजयसोबत तिच्या आईची आणि बहिणींची ओळख करून दिली. विजयने त्या घरात चोहीकडे एक नजर फिरवली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. प्रतिभाची आई विजयसाठी फ्रीजमधील पाणी घेऊन आली विजय त्यांना म्ह्णाला मी फ्रीजच पाणी पित नाही मला साध पाणी आणा आणि सर चहा कॉफी काय घेणार या प्रतिभाच्या बहिणीच्या प्रश्नाला विजय म्ह्णाली, कोरी चहा बनवं आला घालून ! प्रतिभाची लहान बहीण एका बाजुला बसून एका पुस्तकात पहुन एक चित्र काढण्याचा असफल प्रयत्न करत होती ते पाहून विजय म्ह्णाली मी काढू का ? त्यावर त्याला नाही कसं बोलणार म्ह्णून प्रतिभाच्या बहिनीने तिची वही त्याच्या हातात दिली पण विजय ते चित्र काढू शकेल अशी तिला खात्री वाटत नव्हती पण काही मिनिटात सराईत चित्रकारासारखे काही मिनिटात विजयने ते चित्र रेखाटल्यावर प्रतिभानेही तोंडात बोटे घातली. चहा पिता – पिता विजयने प्रतिभाच्या आईला प्रश्न केला आई जेवनात काय केलय त्यावर प्रतिभाची आई भेंड्याचे भरीत आणि पोळ्या केल्या आहेत. त्यावर विजय म्ह्णाला, भेड्याचे भरीत मला फार आवडते एका पोळी सोबत थोड आणता का प्लीज ! ते एकताच प्रतिभाची आई भेंड्याच भरीत आणि पोळ्या घेऊन आल्यावर विजयने ते चवीने खाल्ले. निघता – निघता विजय प्रतिभाच्या आईला म्ह्णाला, सॉरी हा ! आई मी न सांगता आचानक आलो, माझ्यामुळे तुंम्हाला उगाच त्रास झाला असेल त्यावर प्रतिभाची आई म्ह्णाली त्रास कसला ? अहो ! तुमचच घर आहे असं समजा आणि कधी ही आलात तरी चालेल ! निघताना येतो मी ! हे विजयचे शब्द प्रतिभाच्या हद्याला भिडले. विजय निघून गेल्यावर प्रतिभाच्या जीवात जीव आला नाहीतर तिचा जीव टांगनीला लागला होता. प्रतिभाने तिला आलेला घाम फुसून विजयसाठी आणलेली थंड पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली. प्रतिभाची आई प्रतिभाला म्ह्णाली हे काय ? प्रतिभा तू उगाचच तुझ्या सरांना जमदग्नी म्ह्णत असतेस ते किती साधे – सरळ, संस्कारी आणि दिसायलाही गोड आहेत. त्यावर प्रतिभा तिच्या आईल म्ह्णाली, तू एका भेटीत त्यांना काय ओळखणार आमचे सर म्ह्णजे कोणालाही न उलगडलेल एक कोडं आहेत ते अजून त्यांच्या बाबांनाही कळले नाहीत तर तुला काय कळणार ? त्यांच्यासोबत चार वर्षे मी काम करतेय पण त्यांचे काही गुण मला आज कळता आहेत. त्यारात्री झोपताना कधी नव्हे तो प्रतिभा विजयबद्द्ल वेगळा विचार करू लागली होती. विजयचा ती नव्याने विचार करत होती. विजय नावाचा कोणी अनोळखी पुरूष अचानक आपल्या आयुष्यात आल्याचा तिला भास होत होता आचानक विजयच्या ती प्रेमात पडतेय की काय असं तिला वाटू लागल होतं. विजय तिला आता एक बॉस म्ह्णून नाही पण एक पुरुष म्हणून आवडू लागला होता. रात्रभर विजयच्या अनपेक्षित वागण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल विचार करून प्रतिभाला जागरण झालं त्यामुळे तिला ऑफिसात यायला किंचित उशीरच झाला पण विजयच कॅबीनमध्ये नाही हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने ड्रायव्हरला विजय बद्दल विचारल्यावर तो तिला म्ह्णाला, आज मनिषा आली नाही त्यामुळे सर स्वतःच त्यांचा नाश्ता तयार करता आहेत. ते ऐकुण प्रतिभाला धक्काच बसला. उत्सुकता म्ह्णून कधी नव्हे ते प्रतिभा स्वयंपाक घरात गेली तर विजयने कांदापोहे तयार केले होते. प्रतिभाने मागूनच प्रश्न केला काही मदत करू का सर ? त्यावर विजय तिला म्ह्णाला, आता फक्त खायला मदत कर प्रतिभाने कांदापोहे प्लेटमध्ये काढले आणि विजयच्या आग्रहाखातर एक प्लेट हातात घेतली तर कांदापोहे अप्रतिम झाले होते ते खाता- खाता तिने प्रश्न केला आज मनिषा आली नाही का ? त्यावर विजय म्ह्णाला तिचा फोन आला होता तिची तब्बेत बरी नाही मी म्ह्णालो आराम कर दोन- चार दिवस ! त्यावर प्रतिभा म्ह्णाली, सर मग तुमच रात्रीच जेवण ! त्यावर विजय म्ह्णाला तू काळजी करू नकोस मला सारा स्वयंपाक करता येतो पोळ्याही लाटता येता. त्यावर प्रतिभा म्हणाली, आता मला हे कांदापोहे खाऊन खात्री पटलेय की तुंम्ही उत्तम स्वयंपाकीही आहात पण मनिषा येत नाही तोवर मिच पाहात जाईन तुमच्या नाश्ताचं आणि जेवनाच ! त्यावर विजय म्हणाला ठिक आहे तशी ही आता मला स्वयंपाक करायची सवय राहिलेली नाही पूर्वी आई आजारी पडल्यावर आई नोकरी करत असाताना नाईलाज म्ह्णून स्वयंपाक करायला शिकलो होतो पुढे तो बर्‍याचदा कामाला आला आमचे बाबाही उत्तम स्वयंपाकी आहेत पण त्यांना सारे भारी पदार्थच बनवता येतात. त्याचे हे बोलणे ऐकताना प्रतिभा स्वतःशीच विचार करत होती एखादा पुरुष इतका सर्वगुणसंपन्न कसा असू शकतो आणि असं असताना कोणी स्त्री त्यांच्या प्रेमात पडली नसेल ही शक्यता कमीच आहे, मला नेहमीच जाणवत आमच्या कार्यालयात त्यांना भेटायला येणार्‍या बायकांच्या नजरेत त्यांच्याबद्दल विचित्र भावना दिसतात. त्यात त्यांची काही चूक आहे असं नाही म्ह्णता येणार सरांनी स्वतःच्या शरिरकडे दुर्लक्ष केलेले नाही नियमित व्ययाम, चालने चुकत नाही खाण्यावरही त्यांचे नियंत्रण आहे. दिसतात ही एखाद्या नायकासारखे आई म्हणते त्यात तथ्य आहे कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावं असेच सर आहेत. मग ! इतक्या वर्षात मला त्यांच्याबद्दल कसं काहीच वाटलं नाही. खरं म्ह्णजे मी आतापर्यंत त्यांच्याकडे कधी या दृष्टीने पाहिलेच नव्हते. स्वयंपाक घरातील सार आटपून दिवसभर ऑफीसमधील कामे करून संध्याकाळी विजयसाठी रात्रीचा स्वयंपाक तयार करून प्रतिभा जायला निघाली तेंव्हा विजयने तिच्या हातात एक चॉकलेटचा डबा दिला आणि म्ह्णाला, काल मी तुझ्या घरी अचानक आलो त्यामुळे काही सोबत आणता आले नव्हते हा चॉकलेटचा डबा तुझ्या बहिणींसाठी तुझी लहान बहिण फारच गोड आहे मी विचारलं सांग तिला. प्रतिभा निघून गेल्यावर विजयने रात्री प्रतिभाने तयार केलेल्या स्वयंपाकावर ताव मारला आणि स्वतःशीच म्ह्णाला पोरगी भारी आहे ! दुसर्‍या दिवशी प्रतिभा जरा लवकरच ऑफीसात आली आणि विजयसाठी चहा नाष्ता तयार करून त्याची वाट पाहात उभी होती. विजय त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आला. तो बोलण्यापूर्वीच प्रतिभा म्ह्णाली,’ सर मी लवकर आले आणि तुमच्यासाठी नाष्ता तयार केला. चहा पिता पिता विजयने प्रतिभाला प्रश्न केला,’ चॉकलेट आवडले का छोटीला ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली हो खूपच आवडले तिने तुमचे आभार मानलेत आणि हे गुलाबाचे फुल तुंम्हाला भेट म्ह्णून दयायला सांगितले आहे. ते गुलाबाचे फुल प्रतिभा विजयच्या हातात देत असताना दोघांच्याही हद्यात एक विचित्र हालचाल होत होती. दोघांच्याही हृद्याची स्पंदने अचानक वाढली होती. विजयने तो गुलाब जवळच असणार्‍या फ्लॉवरपॉटमध्ये टेवला आणि दोघेही कामाला लागले. विजयने यापूर्वी कधीच प्रतिभाकडे त्या नजरेने पाहिले नव्हते. पण आज का कोणास जाणे विजयला प्रतिभाकडे आणि प्रतिभाला विजयकडे चोरून पाहावेसे वाटत होते. पण प्रतिभाच्या मनात अचानाक विचार आला सर अविवाहीत आहेत त्यांचा भुतकाळ पाहाता ते फारच रसिक असावेत तेंव्हा त्याच्या आयुष्यात कोणी आली नसेल ही शक्यता कमी आहे. जर सरांना लग्न करायचेच नसेल तर मी उगाच त्यांच्यात न गुंतलेलेच बरे ! उगाच नंतर मला त्याचाच त्रास होईल. थोड्या वेळाने विजय प्रतिभाला म्ह्णाला चल आपल्याला मनिषाच्या घरी जायचय तिला पाहायला तिची तब्बेत बरी नव्हती ना ? पाहू आता कशी आहे ते ? फोनवर ती बरी आहे म्ह्णाली पण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेली बरी ! ते ऐकून प्रतिभाला आश्चर्य वाटल हा इतका मोठा माणूस आपल्याकडे स्वयंपाकीन म्ह्णून काम करणार्‍या एका सामान्य बाईची इतकी काळजी का करतोय ? पण त्या बद्दल विजयला स्पष्ट विचारण्याची हिंमत प्रतिभात नव्हती. विजय प्रतिभासह जेंव्हा मनिषाच्या घरी पोहचला. मनिषाच्या घरची सध्याची परिस्थिती फार वाईट नव्हती पण चांगली म्ह्णता येईल अशीही नव्हती. प्रतिभासह विजयला दारात पाहाताच प्रतिभा बिछाण्यावर उटून बसली. मनिषाची मुले बाजूला खेळ्त होती. आत जाताच विजयने त्यांच्या हाता मिठाईचा पुडा दिला आणि मनिषाच्या सासूची चौकशी केली. मनिषाची सासू चहापाणी घेऊन आले विजयने मनिषाच्या तब्बेतीची चौकशी केली. मनिषाचा नवर घरी नव्हता. विजय मनिषाला म्हणाला ,’ पुर्ण बरी झाल्याखेरीज कामाला येऊ नकोस आणि औषधपाणी वेळेवर घेत जा ! आणि त्याने मनिषाच्या हातात एक पैशाचे पॉकीट दिले. हे कशाला ? असे मनिषा म्ह्णताच ठेव गरज पडलीच तर ? मी तुझ्या नवर्‍याशीही फोनवर बोलतो. विजय मनिषासोबत बोलतच होता इतक्यात मनिषाचा मावसभाऊ रमेश प्रतिभाच्या तब्बेतीची चौकशी करायला तेथे आला तो बर्‍यापैकी उच्चशिक्षीत दिसत होता. त्याला दारात पाहात विजय उटला आणि दारात जाऊन त्याला मिठीत घेतले त्याने प्रतिभाशी त्याची ओळख करून देत म्ह्णाला हा रमेश ! मनिषाचा मावस भाऊ आणि माझा शाळेय मित्रही ! त्यानंतर त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या ज्या थांबतच नव्हत्या. इतक्या उत्साहाने गप्पा मारताना प्रतिभाने विजयला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. बोलता बोलता रमेश मधेच विजयला म्ह्णाला,’ आता तू मोठा माणूस झाला आहेस, तुला नुसत भेटायला यायच म्ह्टल तरी विचार करावा लागतो. त्यावर विजय त्याला म्ह्णाला, तुझ्यासाठी माझ्या हृद्याचे दारही सदैव उगडे असतात तिथे तू इतर दारांच काय घेऊन बसलास ? मग आमची बहिणाबाई घेते ना तुमची काळजी व्यवस्थित ? त्यावर विजय त्याला म्ह्णाला माझी काळजी घेऊन घेऊनच बिचारी आजारी पडली वाटत ? ती होती म्हणून मी जगलो नाहीतर माझे काय झाले असते त्या पांडुरंगालाच ठाऊक ? इतक्यात विजयचा मोबाईल वाजला, विजय मनिषा आणि रमेशला म्ह्णाला, रमेश मी निघतो आता एक दिवस भेटू आपन निवांत मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत आनि हो मनिषा तब्बेतीची काळजी घे माझी काळजी करू नकास आता प्रतिभा सांभाळ्तेय माझं जेवनखाणं तुझ्या गैरहजेरीत. प्रतिभाला तिच्या घरी सोडून एका मिटींगला जायचे आहे. प्रतिभा विजयसोबत निघाली खरी पण मनिषा विजयच्या जीवलग मित्राची बहिण आहे तरीच मी विचार करत होते विजय सारख्या मानसाला एका स्वयंपाक करणार्‍या बाईची इतकी काळजी का असावी ? गाडीत प्रतिभा विजयच्या शेजारीच बसली होती ती काही बोलण्यापूर्वीच विजय प्रतिभाला म्ह्णाला,’ आज मनिषा आपल्याकडे स्वयंपाकीन म्ह्णून काम करत असली तरी ती फक्त माझ्या मित्राची बहिण नाहीतर माझीही चांगली मैत्रीण आहे. तिच्या नवर्‍याचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून ती नोकरीच्या शोधात होती तिच्यासाठी रमेशने माझ्याकडे शब्द टाकला म्हणून मी तिला हे काम करशिल का ? म्ह्णून विचारना केल असता फक्त गरज म्ह्णून नाही तर माझ्यावरील प्रेमापोटी ती हे काम करायला तयार झाली तिच्यामुळेच मला स्वतःला कामात झोकून देणे शक्य झाले माझी तब्बेत तिनेच सांभाळली तिचे उपकार आहेत माझ्यावर जे मी कधीच विसरणार नाही. तिच्या उपकाराची परतफेड मी या जन्मात करू शकणार नाही. त्यानंतर प्रतिभाशी बोलायला काही शिल्लकच राहिले नाही. विजय प्रतिभाला तिच्या घराजवळ सोडून पुढे मिटींगला निघून गेला. त्यानंतर एके दिवशी मनिषाने प्रतिभा कामावर आली असता निरोप दिला की तुला साहेबांनी त्यांच्या खोलीत बोलावले आहे ? त्यावर प्रतिभाने मनिषाला प्रश्न केला सर तुझे मित्र आहेत मग तू त्यांना साहेब का म्ह्णतेस त्यावर मनिषा म्ह्णाली मी त्याला आता साहेब म्ह्णत नाही पूर्वीपासूनच साहेब म्ह्णते तुंम्हाला नाही कळणार ! तुंम्ही जा साहेबांना भेटा ते तुमची वाट पाहात असतील तोपर्यंत मी आता चहा नाष्ता घेऊन येते. प्रतिभा आज पहिल्यांदाच विजयच्या खोलीत जात होती. प्रतिभाने विजयच्या खोलीचा दार ठोटावला विजर दार उगडच आहे ये आत ! म्ह्णताच प्रतिभाने आत पाऊल ठेवताच तिने समोर पाहिले तर ती भिंत पुस्तकांनी भरलेली होती, एका भिंतीवर कित्येक प्रमाणपत्रे आणि सन्मानपत्रे फ्रेम करून लावलेली होती त्याखाली विजयने मोठ- मोठया साहित्यीकांसोबत काढलेले छायाचित्रे आणि त्याला त्याच्या साहित्यसेवेसाठी मिळालेले स्मृतीचिन्हे व्यवस्थित लावलेली होती. ती खोली म्ह्णजे विजय किती मोठा साहित्यीकही आहे याची साक्षिदार होती. विजय एका खूर्चीवर बसून पाय समोरच्या छोट्या टेबलावर ठेऊन बसला होता आणि आपल्या मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. विजयची प्रतिभाकडे पाट असल्यामुळे तो काहीतरी मराठीत टाईप करतोय हे प्रतिभाला स्पष्ट दिसले. प्रतिभा त्याच्या जवळ येऊन त्याला म्ह्णाली सर मला येथे का बोलावलत ? हो ! बस सांगतो प्रतिभा त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. आणि स्वतःशीच विचार करू लागले सर जर उद्योगपती नसते झाले तरी एक मोठा लेखक नक्कीच झाले असते. विजयने दहा पास्तके लिहली आहेत हे प्रतिभाला नव्यानेच कळले होते विजयच्या शेकडो कथा, कविता आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांची ती खोली साक्षिदार होती. त्याला साहित्यासाठी मिळालेले मानसन्मान त्या खोलीत बंधिस्त होते. त्याने काढलेली चित्रे त्याने स्वतःच्या हाताने हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू हे सार तो किती रसिक आहे याच्या साक्षिदार होत्या. इतक्यात मनिषा चहा नाष्ता घेऊन आत आली मनिषा रोज विजयसोबतच नाष्ता करते हे प्रतिभाला नव्याने कळले. चहा पिता- पिता विजय मनिषाला म्ह्णाला, तुझ्या हातावरची मेहंदी छान आहे कोणी काढली ? त्यावर मनिषा म्ह्णाली, कविताने ! छान काढली आहे ना ? तुच तर शिकवलीस ना तिला मेहंदी काढायला पण आता मेहंदी काढण्यात तिचा कोणी हात धरू शकत नाही हा ! तुला आठवत तू कित्याकदा माझ्या आणि कविताच्या हातावर मेहांदी काढली होतीस ? त्यावर विजय म्ह्णाला, ते मी विसरने शक्य तरी आहे का ? हे सारं ऐकून नराहून प्रतिभाने मनिषाला प्रश्न केलाच ही कविता कोण ? त्यावर मनिषा म्ह्णाली, तुम्हाला माहीत नाही अहो ! सरांची लहान बहीण माझी सर्वात आवडती मैत्रीण ! आमच्या शेजारच्या इमारतीतच राहते सर तिला प्रेमाने बेबी म्ह्णतात तिने सरांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला आणि सर तिच्यावर रागावले तेंव्हा पासून ते तिच्याशी कामापुरतच बोलतात. त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात आणि तिच्याकडे गेला नाहीत याचा तिला खूप राग आलाय. तस ती स्पष्ट बोलली नाही पण मला जाणवल कारण कविता फारच गोड आहे, पाहताक्षणी कोणीही तिच्याप्रेमात पडावं इतकी ती साहेबांना भेटायला येथे कधीच येत नाही पण साहेबांची माझ्याकडे सतत चौकशी करत असते. उद्या तिच्या मुलाचा विशालचा वाढदिवस आहे. साहेबा तुझ्या लक्षात आहे ना ? खरं म्ह्णजे विजयच्या लक्षात नव्हतं पण मनिषामुळे त्याला हे कळले होते मनिषालाही त्याला अशा काही गोष्टींची स्वतःहून आठवण करून द्यायची सवयच झाली होती. विजय मनिषाला म्ह्णाली उद्या तू लवकर जा आणि जाताना विशालसाठी माझे गिफ्ट घेऊन जा ! मनिषा निघून गेल्यावर विजय प्रतिभाला म्ह्णाला माझ्या या खोळीत फक्त मनिषाला प्रवेश होता आणि आता तुला ! तुला वाचनाची आवड आहे, तुझी मराठीही उत्तम आहे तुला संगणकावर मराठी टायपिंगही करता येते तू हा लॅपटॉप तुझ्याकडेच ठेव यापुढे मी लिहलेले लेख तुला सवड भेटेल तेंव्हा तू लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवत जा ! मी तुला त्याचे वेगळे पैसे देईन त्यावर प्रतिभा म्ह्णाली त्याचे जर तुम्ही मला वेगळे पैसे देणार असाल तर हे काम मी करणार नाही. विजयने बर म्ह्णून एक वही आणि तो लॅपटॉप तिच्या हातात दिला. त्याच्या दुसर्‍या दिवशी मनिषा घरी जायला निघाली असता विजय तिला म्ह्णाला तू प्रतिभालाही सोबत घेऊन जा विशालच्या वाढदिवसाला ती माझ्यावतीने त्याला शुभेच्छा देईल आणि तिची कविताशी ओळखही होईल आणि ती त्या दिवसाबद्दल माझ्यावतीने तिची माफीही मागेल. त्याने प्रतिभाला चालेल ना म्ह्णताच प्रतिभाने आनंदाने होकार दिला. मनिषा प्रतिभासह कविताच्या घरी गेली असता प्रतिभा मागे असल्यामुळे प्रतिभाला दिसली नाही तिने मनिषाचे अलिंगण देऊन स्वागत केले आणि तिला आत बोलावले त्यावर मनिषा प्रतिभा मॅडम या ना म्ह्णताच कविताचे लक्ष प्रतिभाकडे गेले आणि तिला पाहताच तिला भयंकर आनंद झाला तिने धावत जाऊन प्रतिभाला आपल्या मिठीत भरून घेतले आणि प्रश्न केला अग ! प्रतिभा तू कशी काय येथे ? त्यावर मनिषा म्ह्णाली तू ओळखतेस यांना त्यावर कविता म्ह्णाली अग ! ओळखतेस म्ह्णजे काय आम्ही शाळा कॉलेजात एकत्रच होतो शिकायला पण मधल्या काही वर्षात आमची भेटच झाली नाही. त्यावर मनिषा म्ह्णाली अग ! ही गेली चार वर्षे विजयच्याच ऑफीसमध्ये काम करतेय. त्यानंतर प्रतिभा आणि कविताच्या गप्पा रंगल्या ज्यात विजय कोठेच नव्हता प्रतिभा आता कविताच्या घरातीलच झाली होती इतक्यात विजयचे बाबा तेथे आल्यावर त्यांनी प्रतिभाला पाहिले आणि त्यांना फार आनंद झाला कविताने बाबांशी प्रतिभा आणि मनिषाची ओळख करून दिल्यावर बाबा मनिषावर किंचित रागावले आणि म्ह्णाले मी विजयच्या ऑफीसमध्ये गेलो तेंव्हा ही मनिषा मला टाळण्यासाठी समोर थांबलीच नाही तिला वाटल मी तिला ओळखलच नाही. त्यावर मनिषा सॉरी म्ह्णताच बाबा म्ह्णाले अग ! मी काही तुझ्यावर रागावलो नाही मला समजू शकत तू असं का केलंस ते , पण प्रतिभा त्याने त्याच्या ऐवजी तुला पाटवल हे बर केल निदान त्यामुळे तुझी आणि कविताची भेटतरी झाली नाहीतर तू विजयकडे कामाला आहेस हे तिला कधी कळलच नसतं. तुझा साहेब तसा घरातील कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित नसतोच त्यालाही आठवत नसेल त्याने हजेरी लावलेला शेवटचा घरगुती कार्यक्रम कोणता होता ? प्रतिभाने निघताना विशालच्या हातात विजयने दिलेले आणि तिने त्याच्यासाठी घेतले गिफ्ट दिले विजयने दिलेला विडिओ गेम पाहताच विशालला भयंकर आनंद झाला आणि तो प्रतिभाला मिठी मारत उत्साहाने म्ह्णाला, मामी मामाला थॅक यू सांग त्यावर कविता अरे ! तिला मामी काय म्ह्णतोयस ? त्यावर विशाल म्ह्णाला, सॉरी मामी तोंडात बसलयं ना म्हणून बोलून गेलो, कविताने प्रतिभा निघता- निघता तिच्या आईची आणि बहिणींची चोकशी केली. कविता शाळेत असताना प्रतिभाच्या घरी जात असे. तिने प्रतिभाकडे तिच्या घरच्यांसाठी केक आणि चॉकलेट एका पिशवीत भरून दिले. कविता प्रतिभाला म्ह्णाली आता तू माझी मैत्रीण म्ह्णून मला कधीही माझ्या घरी भेटायला येऊ शकतेस आणि मी उद्याच तुला तुझ्या ऑफीसमध्ये तुझी मैत्रीण म्ह्णून भेटायला येते. त्याच्याच दुसर्‍या दिवशी कविता विजयच्या ऑफीसमधे टपकली ती विजयच्या केबिनमधे जाऊन त्याला केक देत म्ह्णाली, मी तुला नाही प्रतिभाला भेटायला आले होते ती माझी शाळेतील मैत्रीण आहे तुला आठवत मी शाळेत असताना तू क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचास तेंव्हा मी तिच्याशी तुझी ओळख करून दिली होती. त्यावर विजय काही बोलण्यापूर्वीच कविता तरातरा निघून गेल्यावर विजय केक खाता-खाता स्वतःशीच काही तरी विचार करू लागला. थोड्या वेळाने विजयने प्रतिभाला त्याच्या केबीनमधे बोलावून घेतले आणि विचारले की कविता तुझी वर्गमैत्रीण आहे ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली, हो ! काय योगा-योग आहे बघा ना ! आम्ही शाळेत असताना तुम्ही प्रतिभाला लिहून दिलेले निबंध आणि कविता आम्ही कॉफी करायचो त्यावरून घडलेले किस्से आठवून मला आजही हसू येत आहे. आणि आताही तुम्ही मला तेच काम दिलेत तुम्ही लिहलेले कॉफी मारण्याचे काम फक्त संगनकावर ! विजय ठिक आहे तू जा म्हणताच जाताना प्रतिभा स्वतःशीच म्ह्णाली, तुम्हाला कसं सांगू तेंव्हा कविता सोबत तुम्हाला पाहताच मी तुमच्या प्रेमात पडले होते.पण तेंव्हा तुम्ही किती गोड लाडू होतात आणि आता कडू कारलं झाला आहात. प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशीच म्ह्णाला ही तिच प्रतिभा आहे जिला पाहातक्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि प्रतिभा हे नाव माझ्या हृद्यावर कायमच कोरल गेल होत. आज कित्येक वर्षानंतर विजय मनापासून ह्सत होता. खरं तर त्याला नाचावसं वाटत होतं. पण आता ते त्याला शोभणार नव्हतं. विजयने प्रतिभाला पुन्हा बोलावले आणि विचारले कविताने ऑफीसमधे सर्वांना केक वाटला का ? त्यावर प्रतिभा हो ! म्ह्णताच विजय तिला म्ह्णाला आज दुपार नंतर ऑफीसमधे सर्वांच्या आवडीच असं काहीतरी छानस खायला मागवं. विजयला आनंदात पाहून प्रतिभालाही आनंद झाला जाता जाता प्रतिभा मनिषाला म्ह्णाली, आज सर खूप आनंदात आहेत त्यावर मनिषा म्ह्णाली, हा आनंद कवितला भेटल्याचा आहे. सरांचा कवितावर भयंकर जीव आहे तिच्यासाठी ते काहीही करायला तयार असत तिच्यासाठी त्यांनी खूप स्वप्ने पाहीली होती पण कविताने प्रेमविवह केला आणि सर दुखावले. कोणी कोणाचेच समजून घेतले नाही. पण आज कविताने स्वतःहून एक पाऊल पुढे टाकले आणि सरांना आनंद झाला. त्यावर प्रतिभा म्ह्णाली, सर इतक्या छान प्रेमकथा लिहतात आणि त्यांनी त्यांचा बहिणीच्या प्रेमाला विरोध होता ? त्यावर मनिषा म्ह्णाली, त्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध नव्हता पण तिने लग्नासाठी जी घाई केली त्याला विरोध होता, नाहीतर सरांनी मनात आणल असतं तर त्यांचा विवाह होऊच दिला नसता. त्यांना त्यांनी तिच्यासाठी जी स्वप्ने पाहीली होती ती तुटल्याचा अधिक त्रास झाला. आता देवाच्या कृपेने ती सुखी झाली पण नसती तर सरांनी नक्कीच तिला मदत केलीच असती. सर त्यांच्या घरापासून त्या घरातील माणसांपासून दूर राहतात पण त्यांची नजर गरुडासारखी आपल्या घरावर असते. तुला माहीत नसेल कदाचित सरांनी खूप गरीबीत दिवस काढले पण त्या गरीबीची छळ त्यांनी आपल्या भावंडांना कधीही जानवू दिली नाही. कवितातर एखादया राजकुमारीच जीवन जगत आली लग्न होईपर्यंत तिने कधी साधा गॅसही पेटवलेला नव्हता. सरांनी नंतर आपलं लेखक होण्याच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना कोणाचीच साथ लाभली नाही कारण त्यांनी नेहमी राजासारखं जीवन जगावं असंच सार्‍यांना वाटत होत. त्यातून एका क्षणाला सरांनी पुन्हा पैशाच्या दिशेने धाव घेतली पण यावेळी ही धाव इतकी मोठी होती की त्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही मागे सोडले आणि आता एका शापित राजकुमाराच जीवन या घरात जगत आहेत. ज्या घरात जगातील सारी सुखे असतानाही ते सुखी नाहीत,आनंदी नाहीत सतत एक मुखवटा चेहर्‍यावर चढवून वावरत असतात. हे सार ऐकुन प्रतिभा स्वतःशीच म्ह्णाली, काही दिवसापूर्वी विजय मला फार मोठा वाटत होता पण तो आजही सामन्यच होता. आपला भुतकाळ त्याला जमिनीवरून हळुच देत नव्ह्ता फक्त त्याची नजर आकाशाकडे असते. मी एक क्षणभर का होईना विजयच्या प्रेमात पडले होते याचा मला आज अभिमान वाटतो. अशा माणसाची सेवा करण्यात सारं आयुष्य जरी कामी आलं तरी बेहत्तर ! त्या दिवशी घरी गेल्यावर जेवून प्रतिभा टी.व्ही पाहात असताना प्रतिभाचा फोन खणखणला त्यावरील नंबर पाहून प्रतिभाला सुखद धक्का बसला. तो विजयचा नंबर होता. प्रतिभाने फोन उचलताच विजय म्ह्णाला, सॉरी मी इतक्या रात्री फोन केला. उद्या आपल्याला एका मिटींगासाठी बाहेर जायचे आहे तू सकाळी आठ वाजता तयार रहा ! मी तुला सकाळी पिकअप करेन. सकाळी प्रतिभा तयार होऊन बसली होती इतक्यात विजय तिच्या घरी आला त्याने तिच्या आईशी घाईघाईतच जुजबी चर्चा केली आणि ते निघाले. गाडीजवळ येताच प्रतिभाच्या लक्षात आले की आज ड्रायव्हर सोबत नव्हता ते पाहून प्रतिभाने विजयला प्रश्न केला आज ड्रायव्हर नाही त्यावर विजय म्ह्णाला, नाही आज तो सुट्टीवर आहे घाबरू नकोस मी गाडी बरी चालवतो. त्यावर प्रतिभा म्ह्णाली तुंम्ही सोबत असताना मी कशाला घाबरू ? प्रतिभा गाडीत विजयच्या बजुला जरा सावरूनच बसली. गाडी सुरू झाल्यावर काहीतरी बोलाव म्ह्णून विजय म्ह्णाला, कविताने काही फोन वैगरे केलेला की नाही ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली, हल्ली रोजच संध्याकाळी फोन करते आम्ही खूप गप्पा मारतो. काय गप्पा मारता ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली, त्या गप्पा तुम्हाला सांगण्यासारख्या नाहीत. मुंबईच्या बाहेर गेल्यावर बारीक पाऊस सुरू झाला. विजयने लहान मुलासारखा गाडीची काच खाली करून तो हातावर झेळला. थोड्या अंतरावर एक मक्याची भाजलेली कणसे विकणारा दिसताच विजयने त्याच्याजवळ गाडी थांबवली आणि चार-पाच मक्याची भाजलेली कणसे विकत घेतली आणि थोडावेळ गाडी बाजुला लावून त्यातील एक कणीस प्रतिभाच्या हातात देत एक कणिस स्वतः खाऊन संपविला आनि गाडी सुरू केली प्रतिभा तिचा कणीस सावकाश खात होती. ते पाहून विजय प्रतिभाला म्ह्णाला तुंम्हा बायकांना रस्त्यावरची एकच वस्तू खायला आवडते कोणती ? या प्रतिभाच्या प्रश्नाला उत्तर देत विजय म्ह्णाला, पाणीपुरी ते त्या देवालाच ठाऊक ! त्यावर प्रतिभा म्ह्णाली, मलाही आवडते पण का ते मलाही माहीत नाही. त्यानंतर विजय विनोदाने म्ह्णाला मला वाटत पाणीपुरी खाणं हा बायकांमधे पसरलेला संसर्गजन्य रोग आहे. त्यावर प्रतिभा हसल्यावर तिच्याकडे पाहात विजय म्ह्णाला प्रतिभा तू हसल्यावर गोड दिसतेस पण त्याहीपेक्षा तू हसल्यावर तुझ्या गाळाला पडणार्‍या सुंदर खळ्या अप्रतिम दिसतात ते ऐकुन प्रतिभा किंचित लाजली. मागच्या चार वर्षात विजयला प्रतिभाच्य खळ्य कधीच दिसल्या नव्हत्या म्ह्णजे त्याने त्या पाहिलेल्या नव्हत्या. प्रवासात प्रतिभाच्या एक गोष्ट लक्षात आली की विजय रस्त्यात जेंव्हा जेंव्हा मंदीर दिसायच तेंव्हा पायापडायचा ते पाहून प्रतिभा मनात म्ह्णाली,सर बाकी कोणाच्या बापाला घाबरत नाहीत पण देवाला घाबरतात वाटतं. नराहून प्रतिभाने विजयला प्रश्न केलाच की सर तुमची देवावर फार श्रद्धा आहे वाटत? त्यावर विजय म्ह्णाला माझी देवावर श्रद्धा आहे की नाही मला माहीत नाही पण देवाची माझ्यावर कृपा आहे याची आता मला खात्री पटलेली आहे. त्यावर प्रतिभा म्ह्णाली मलाही आता तसंच वाटू लागल आहे. बघा ना ! कविता तुमची बहीण आहे हे कळल्यावर मला किती गोष्टी नव्याने कळल्या नाहीतर मी तर तुम्हाला जमदग्नीच समजत होते. त्यावर विजय हसून म्ह्णाला मी जमद्ग्नी आहेच पण जमद्ग्नीच्या वाटेला कोणी स्त्री गेल्याचे माझ्या वाचनात आले नाही विश्वामित्रांची तपस्या मात्र मेनकेने भंग केली होती. माझ्यातील जमदग्नीचा आता विश्वामित्र झाला नाही म्ह्णजे मिळवली. त्यावर प्रतिभा मनातल्या मनात म्ह्णाली तुंम्ही विश्वामित्र झालात तर मी मेनका व्हायला तयारच आहे. मिटींग आटपून माघारी येताना प्रतिभा आणि विजय एका हॉटेलात जेवायला थांबले जेवनाची ऑर्डर देताना विजयने स्वतःसाठी शाकाहारी आणि प्रतिभासाठी मांसाहारी जेवन मागविले ते पाहून प्रतिभा म्ह्णाली, सर तुम्ही शाकाहारी कधी झालात ? कविता तर म्ह्णायची तुंम्ही तर संण्डे हो या मंण्डे रज खाये अंण्डे होतात त्यावर विजय म्ह्णाला मी दहा वर्षापूर्वीच शाकाहारी झालोय पण मांसाहारी लोकांसोबत जेवायला मला काही अडचण वाटत नाही. मग ! सर दारू पिणार्‍यासोबत थंडा प्यायलाही तुंम्हाला अडचण वाटत नसेल ना ? प्रतिभाचा हा प्रश्न थोडा खोचक होता पण तो काळजीतून निर्माण झालेला होता त्यावर विजय म्ह्णाला हो ! माझ्या मित्रांसोबत कित्याकदा बार मध्ये बसून मी थंडा प्यायलोय. पण म्ह्णून मला दारू पिण्याचा मोह कधीच झाला नाही कारण मी माझ्या मोहावर विजय मिळविला आहे. मोह नष्ट होणे हेच गितेचे फळ आहे आणि ते मला प्राप्त झालेले आहे. पण सर तुंम्हाला मांसाहारी बायको भेटली तर ? त्यावर विजय म्हणाला मी अजून तरी लग्न न करण्यावर ठाम आहे पण माझा विचार बदललाच तर तिच्या मांसाहारी असण्याने मला काही फरक पडत नाही आमच्या घरात मी आणि माझे बाबा फक्त शाकाहारी आहोत बाकी सारेच मांसाहारी आणि तसही एका घरात दोन शेळ्या बर्‍या नाहीत एक तरी वाघ असायलाच हवा ! त्यावर प्रतिभाही विनोदाने म्ह्णाली सर ! तुंम्ही स्वतःला शेळी म्ह्णताय ! त्यावर दोघेही मनमुराद हसले. सर तुंम्ही इतरपुरुषांपेक्षा वेगळे आहात तुंम्हाला तुमच्या या वेगळेपणाच कौतुक नाही का वाटत ? त्यावर विजय म्ह्णाला, प्रतिभा आता मला तुझं कौतुक वाटत. त्यावर विजय प्रतिभाला म्ह्णाला आता मला तुझं कौतुक वाटतयं तू माझी मुलाखत घेतेयसं त्यावर प्रतिभा गप्प बसल्यावर विजय म्ह्णाला, अग ! मी गंमत करत होतो, मी वेगळा आहे हे खरं आहे पण मी तसा ठरवून झालो नाही परिस्थितीने मला तसा घडवलाय आज तुला माझे जे गुण वाटतायत त्यातीला काही गुण माझी गरज होते. मला कधीच कळलं होत माझा जन्म सर्वसामान्य माणसासारखं जीवन जग्ण्यासाठी झालेला नाही कारण माझ्या आयुष्यात सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडतात तश्या घटना घडत नाहीत. माझ्या आयुष्यात घडलेली लहानात लहान घटनाही काही कारणाने घडली होती. मला समाजात राहूनच समाजासाठी काही करायच नसत ना तर मी सन्याशी झालो असतो. जेवन झाल्यावर विजयने प्रतिभासाठी आईसक्रिम आणि स्वतःसाठी चहा मागविला त्यावर प्रतिभा त्याला म्हणाली सर तुमचा चहाचा मोह काही सुटला नाही. कविता म्ह्णायची तुंम्हाला रात्री बारा वाजता चहा दिली तरी तुंम्ही पिता. त्यावर विजय म्ह्णाला हे खरं आहे हा एकच मोह मला सोडता आला नाही. सर ! तुंम्ही लग्न का केल नाहीत ? प्रतिभाचा आणखी एक प्रश्न त्यावर विजय म्ह्णाला,’’माझ्या स्वप्नातील प्रतिभा प्रत्यक्षात नव्ह्ती ना भेटली. म्ह्णजे आता भेटली का ? दुसरा प्रश्न विजय म्ह्णाला,’’ हो ! म्ह्णजे आता तिचा चेहरा हळु हळु माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट होतोय. सर इतक्या वर्षात खरंच कोणी स्त्री तुमच्या आयुष्यात कधी आलीच नाही ? त्यावर विजय तिला म्ह्णाला,’’मी कविताचा दादा आहे हे समजल्यापासून तू जरा जास्तच बोलायला लागलेस असं नाही का वाटत तुला ? तू हे विसरू नकोस मी तुझ्या मैत्रीणीचा भाऊ असलो तरी तुझा आजही बॉसच आहे. त्यावर प्रतिभा सॉरी बोलून गप्प बसली तिच घर जवळ येईपर्यंत काहीच बोलली नाही विजयही काहीच बोलला नाही फक्त गाडी चालवताना चोरून तिचा रागावलेला चेहरा पाहात होता. गाडी थांबताच प्रतिभा गाडीतून उतरली आणि तिच्या घराच्या दिशेने चालू लागली विजयही तिच्या सोबतच चालत होता त्याने सोबत आणलेल्या खायच्या वस्तू घेतल्या होत्या. प्रतिभाच्या घरी गेल्यावर प्रतिभाच्या आईने त्याला जेवायचा आग्रह केला. विजयने तो आग्रह मोडला नाही प्रतिभाच्या लहान बहिणीसोबत त्याच्या गप्पा रंगल्या इतर दोन बहिणींची त्यांच्या अभ्यासाची त्याने चौकशी केली. त्यांना सोबत आणलेल्या खायच्या वस्तू दिला जेवन झाल्यावर थोडा वेळ प्रतिभाच्या आईशी गप्पा मारताना त्याने त्यांना काही समस्या आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिभाच्या घरात तो असा काही मिसळला होता की जणू तो त्या घराचाच एक भाग असावा. विजय निघताना प्रतिभा त्याला सोडायला गाडीजवळ गेली असता विजय तिला म्ह्णाला तू रागावल्यावरही छानच दिसतेस . त्यावरही प्रतिभा काहीच बोलली नाही. रात्री झापण्यापूर्वी प्रतिभा आईला म्ह्णाली,’’ आई तुला ती माझी वर्गमैत्रीण आठवते आपला घरी यायची ती कविता मराठे त्यावर आई म्ह्णाली अग! कविताला कोण विसरेल किती गोड होती ती राजकुमारीसारखी त्यावर प्रतिभा म्ह्णाली,’’ अग ! ती आमच्या सरांची बहीण आहे. तिच लग्न ही झालयं आणि तिला विशाल नावाचा एक मुलगाही आहे. तुला सांगेन सांगेन म्ह्णाली आणि गडबडीत राहूनच गेल त्यादिवशी मी केक आणला होता तो त्याच्याच बर्थडेचा होता. कविताला ही तुला भेटायच आहे ती एक दिवस आपल्या घरी येणार आहे तुला भेटायला. मी तिला तुझ्याशी फोनवर बोलतेस का ? म्ह्णून विचारल तर ती म्ह्णाली , नको मी प्रत्यक्ष भेटूनच बोलेन. रात्री प्रतिभा झोपण्याच्या तयारीत असताना तिला विजयचा फोन आला त्याने तिला गुड नाईट म्ह्णाला आणि त्याने तिच्या स्वयंपाकाची स्तुतीही केली. प्रतिभाने विजयचा आवाज आपल्या कानात साठवून घेतला. त्या रात्री त्याला आठवून आठवून ती स्वतःशीच हसत होती. कविताच्या निबंधात त्याने लिहलेल्या कविताही तिला आठवू लागल्या होत्या आणि पहिल्यांदा शाळेच्या प्रांगणात झालेली त्याच्या सोबतची नजरा – नजरही आठवत होती.

आता विजय परत लिहू लागला होता कित्येक वर्षानंतर त्याला एक छानसी कविता सुचली होती. त्याचे लिखाण प्रतिभा टाईप करून ठेवत होती आणि ते टाईपकरताना ती नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती. विजय आता तिच्यासोबत फारच मोकळेपणाने वागू लागला होता. त्यातील काही लिखाण विजयने वेगवेगळ्या वर्तमानपत्रात पाठविले होते एक दिवस प्रतिभाला कविताचा फोन आला फोनवर ती प्रतिभाला म्ह्णाली,’ आजच्या वर्तमानपत्रात विजयचा लेख प्रकाशित झाला आहे त्याच्यात हा बदल कसा काय झाला ? तू तर केला नाहीस ना ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली मी फक्त टाईप केलय त्यावर प्रतिभा म्ह्णाली, मी फक्त टाईप केलयं त्यावर कविता म्ह्णाली, ते काही का असेना तू त्याच्या कामी येतेयस तो कशासाठी का होईना तुझ्यावर अवलंबून राहू लागलाय हे उत्तम ! तू माझी मैत्रीण आहेस हे कळल्यापासून तो तुझ्याशी प्रेमाने बोलतो ना ? मी तुझी मैत्रीण असण्याचा आणि सरांनी प्रेमात बोलण्याचा काय संबंध ? त्यावर कविता म्ह्णाली संबंध आहे आपण शाळेत असताना विजय मला शाळेत क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचा एकदा मी तुझी त्याच्याशी ओळख करून दिली होती तेंव्हाच मला वाटत तो तुझ्या प्रेमात पडला होता मला तेंव्हा ही त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दलच प्रेम दिसल होतं. पुढे आपले मार्ग वेगळे झाले आणि आपण लांब गेलो, त्यावर प्रतिभा म्ह्णाली, कविता तू ना ! उगाचच काहीही बोलतेस ! त्यावर प्रतिभा म्ह्णाली, उगाच नाही खोट वाटत असेल तर विचार त्याला ? मला आवडेल तुला वहिनी म्ह्णायला पण तुला माझ्यासारखी नणंद चालेल का ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली तुझ्यासारखी नणंद भेटणार असेल तर मी गाढवाशीही लग्न करायला तयार होईन तिच हे बोलणं मागून ऐकणारा विजय म्ह्णाला कोण गाढवाशी लग्न करतयं ? विजयचा आवाज ऐकताच प्रतिभा किंचित बावरली आणि म्ह्णाली सर ! सॉरी कविताचा फोन होता अशीच थट्टा मस्करी चालू होती. अग ! मग इतकी कशाला घाबरतेस तू बोल तिच्याशी बोलून झालं की माझ्या केबिनमध्ये ये ! विजय निघून गेल्यावर प्रतिभा काही बोलण्यापूर्वीच कविता म्ह्णाली, विजय खरोकरंच गाढव आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल आता तुमच्यासाठी ! फोन ठावल्यावर कविता स्वतःशीच म्ह्णाली, कविता माझी नणंद व्हायला तयार आहे म्ह्णजे अर्धी लढाई मी न लढताच जिंकले आहे. ती म्हणत होती की एकदा सर ही माझ्या प्रेमात पडले होते, त्यात जर तथ्य असेल तर कदाचित माझं प्रेम यशस्वी होईल. काही दिवसांनी कविता एक दिवस अचानक विजयला भेटायला आली अणि आईची तब्बेत थोडी ठिक नाही तर मी तिला भेटायला गावी जाणार आहे कविताला मी माझ्या सोबत घेऊन जाणार आहे तस मी तिच्या आईला प्रत्यक्ष भेटून बोललेय तू ही येणार असशील तर आमची गाडी घेऊन जाऊया ! त्यावर विजय म्ह्णाला, तुझी गाडी नको माझीच गाडी घेऊन जाऊया ड्रायव्हरला सोबत घेतो. कविताला विजय इतक्या सहजासहजी तयार होईल हे अपेक्षित नव्हते. पण तिला खूप आनंद झाला इतक्यात प्रतिभा आल्यावर मनिषासह त्या तिघींच्या गप्पा रंगल्या त्यांचे चहापाणी झाले तेंव्हा पहिल्यांदा कविताने विजयचे घर आणि ऑफीस आतून बाहेरून संपूर्ण पाहिले. दुसर्‍या दिवशी विजय कविताच्या घरी गेला बर्‍याच वर्षानंतर इतक्या वर्षी त्याला घरी आलेलं पाहून कविताच्या सासरच्यांना प्रचंड आनंद झाला सर्वाधिक आनंद विशालला झाला. त्याने विशालसाठी आणलेले चॉकलेट त्याला दिले. विजयने कविताच्या घरातील सार्‍यांचीच आस्तेने चौकशी केली चहा- नाश्ता वैगरे झाल्यावर विजय कविताला घेऊन प्रतिभाच्या घरी गेला तेंव्हा प्रतिभा तयारी करूनच बसली होती. प्रतिभाच्या आईशी थोडावेळ जुजबी बोलून ते पुढच्या प्रवासाला निघाले. वाटेत प्रतिभा आणि कविताच्या गप्पा रंगल्या विजय मात्र फक्त त्या शांतपणे ऐकून घेत होता. कोकणात आपल्या गावातील घराजवळ पोहचेपर्यंत गाडी अनेक जागी थांबली होती कविता तर सहलीचाच आनंद घेत होती कविता सोबतीला असल्यामुळे प्रतिभाचा आनंदही ओसंडून वाहात होता. तिला हसताना पाहून विजय पुन्हा पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडत होता. कित्याक वर्षानंतर विजयला ही असं वाटत होत की तो मोकळ्या हवेत श्वास घेतोय नाहीतरी त्याला ही त्याच्या आयुष्यातील धावपळीचा आता कंटाळा आला होता. विजयची गाडी विजयच्या कोकणातील घराच्या दारासमोर थांबली गाडीचा आवाज ऐकून विजयचे बाबा बाहेर आले, विजयला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला पण त्यांनी तो चेहर्‍यावर दिसू दिला नाही. इतक्यात विजयची आईही बाहेर आल्यावर कविताने तिला मिठी मारली विजय जवळ जाताच आईने त्याच्या चेहर्‍यावरून प्रेमाने हात फिरवला. प्रतिभा आईच्या वाकून पाया पडताच आईने तिला सुखी रहा असा आर्शीवाद दिला आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरविला कविताने प्रतिभाशी आईची ओळख करून दिली, ही माझ्या शाळेपासूनची मैत्रीण आहे मी शाळेत असताना बर्‍याचदा आपल्या घरी आली होती. तुला कदाचित आठवत नसेल त्यावर आई म्ह्णाली न आठवायला काय झालंय ही प्रतिभाना ! मला चांगली आठवतेय आपल्या घरी आल्यावर हिच तर चहा बनवायची तुमच्यासाठी तिच्या आईलाही मी चांगली ओळखते आमच्या बर्‍यापैकी मैत्री होती. प्रतिभा तुझी आई कशी आहे आणि तुझ्या तीन लहान बहिणी कशा आहेत ? तुझे बाबा गेल्याच कळ्लं पण त्यानंतर आमची कधी भेटच झाली नाही. हो ! प्रतिभाची आईही तुझी आठवण काढत होती मुंबईला आल्यावर त्या तुला भेटायला येणार आहे. कविता मधेच म्ह्णाली. विजयसाठी हे सारंच अनपेक्षित होत. कविताच्या आईने पुढचा प्रश्न विचारला पण आता प्रतिबा तुला कोठे भेटली मला वाटत होत तिचही लग्न वैगरे झालं असेल. त्यावर कविता म्ह्णाली, अग ! आई प्रतिभा आता विजयच्याच ऑफीसमधे कामाला आहे म्ह्णून तर आमची पुन्हा भेट झाली, तुझ्या तब्बेतीची चौकशी करायला येतच होते तर तिलाही म्हटले चल माझ्या सोबत ! त्यावर कविताची आई म्ह्णाली बर ! झालं तू तिला सोबत घेऊन आलीस ! चला आता तुंम्ही अंघोळ वैगरे करून घ्या ! घरात पाऊल ठेवताच विजयने आईच्या तब्बेतीची चौकशी केली असता ती म्ह्णाली, आता तू आणि कविता आलात ना तुम्हाला पाहिल आणि मी बरी झाले. विजयने तरीही बाबांना प्रश्न केला काय म्ह्णाले डॉक्टर ? त्यावर बाबा म्ह्णाले काही खास नाही थोडा अशक्त पणा आहे. त्यावर विजय म्ह्णाला त्यांना उद्या पुन्हा बोलवा मला बोलायचंय त्यांच्याशी. थोडावेळ खुर्चीत शांत बसल्यावर विजय घराच्या मगील दारा समारील मोकळ्या जागेत नारळांच्या झाडाखाली आंघोळ करायला गेला ता आंघोळ करत असताना प्रतिभा त्याच्या पिळदार शरिराकडे चोरून पाहात असताना कविताने तिला पाहिल आणि ती तिला म्ह्णाली माझ्या भावाला नजर लावू नकोस त्यावर प्रतिभा म्ह्णाली, मी ती मागची नारळाची झाडे पाहात होती. आंघोळ वैगरे झाल्यावर प्रतिभा आईंना कामात मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता आई तिला म्ह्णाली प्रतिभा तू या घरात पाहूनी आहेस तुला कामे करण्याची काही गरज नाही येथे कामे करायला बरीच मानसे आहेत आता देवाच्या कृपेने त्यावर प्रतिभा स्वयंपाक करणार्‍या बाईला म्ह्णाली मावशी सर दुधाचा चहा पित नाही त्यांना आले घातलेला कोरा चहा लागतो आणि स्वयंपाक शाकाहारी मसाले कमी वापरा आणि शक्यतो तळलेले पदार्थ बनवू नका त्यांच्यासाठी ! मला आणि कविताला काहीही चालेल त्यावर आई म्हणाल्या प्रतिभा तुला विजयच्या बर्‍याच बारीक सारीक गोष्टी माहित आहेत किती वर्षे त्याच्या सोबत काम करतेयस त्यावर प्रतिभा चार वर्षे म्हणताच आई म्ह्णाल्या चार वर्षे म्ह्णजे तू त्याला आता आतून बाहेरून ओळखायला लागली असशील त्यावर प्रतिभाने मानेनेच होकार देताच आई प्रतिभाला म्ह्णाली जा तू विजय आणि कवितासाठी चहा नाश्ता घेऊन जा आणि तूही त्यांच्यासोबतच घे आणि आराम कर! कविता आणि विजय थकल्यामुळे आराम करत असताना कविता मात्र पडवीतील झोपाळ्यावर बसून झोके घेत टी.व्हीवर चित्रपट पाहत होती तिला निवांत बसलेल पाहून आई ही तिच्या शेजारी बसली आणि कविताला म्ह्णाली, तुला काय तुझ्या दादाच्या लग्नाची काळजी वैगरे आहे की नाही ? त्यावर कविता गाळात गोड हसून म्ह्णाली, आई ! तुला काय मी एवढी धावपळ करून तुझ्या तब्बेतीची चौकशी करायला आले आणि यायचच असत तर माझ्या नवर्‍याला घेऊन नसते का आले ? मी इकडे तुला तुझ्या होणार्‍या सुनेच मुख दर्शन देण्यासाठी घेऊन आलेय मला खात्री होती तिला पाहिलं की तू ठणठणीत होशील. त्यावर आई खरंच की काय ? म्हाणून त्यांनी देवाचे आभार मानले आणि पढचे प्रश्न विजय म्ह्णाला का तुला काही तसं तुझं प्रतिभाशी बोलण झालं का ? त्यावर कविता म्हणाली किती प्रश्न विचारशील अजून तस काही बोलण झालं नाही पण दोघांच्याही डोळ्यात मला ते दिसतयं आता आंम्ही चार-पाच दिवस आहोत ना इकडे तोपर्यंत मी त्यांचा निकाल लावेनच तू खात्री बाळग जाताना मी तुला एक आनंदाची बातमी देऊनच जाईन पण त्यासाठी मला थोडी तुझीही मदत लागेल. थोड्यावेळाने कविता विजयला म्ह्णाली, विजय जरा बाजारात जाऊन माझ्यासाठी थोडे सामान घेऊन ये प्रतिभाला सोबत घेऊन जा ! त्यानिमित्ताने आपला गावही ती जवळून पाहिल मी आले असते पण मला कंटाळा आलाय मी आईजवळच थांबते. विजय प्रतिभासह चालतच बाजाराच्या दिशेने निघाला चालता चालता प्रतिभा विजयला म्ह्णाली सर ! तुंम्ही गाडी का घेतली नाहीत ? त्यावर विजय म्ह्णाला, तुला चालायचा कंटाळा आलाय का ? त्यावर छे हो ! तुंम्हाला चालायची सवय नाही ना ? त्यावर विजय म्ह्णाला, मी काही पायाला मेहंदी लावून जन्माला आलो नव्हतो. त्यानंतर नेहमी सारखी प्रतिभा गप्प झाल्यावर विजय म्ह्णाला, अगं मी विनोद केला . त्यावर प्रतिभा म्ह्णाली सर तुंम्ही विनाद कधी करता आणि गंभीर कधी असता तेच काही कळ्त नाही. त्यावर विजय म्ह्णाला कळेल हळूहळू ! चालता- चालता रस्त्यापासून थोड्या अंतरावर आत विजयला गावचे देऊळ नजरेस पडताच तो प्रतिभासह देवळात गेला आणि देवाचं दर्शन झाल्यावर विजय देवळातील गुरवाच्या पाया पडला म्ह्णून प्रतिभाही पाया पडल्यावर त्याने सौभाग्यवती भवः असा आर्शीवाद दिला. प्रतिभा किचिंत ओशाळली पण काहीच बोलली नाही. त्यावर विजयनेही काही प्रतिक्रिया दिली नाही. चालत चालत गावं पाहत ते दोघे गावच्या बाजारात पोहचले प्रतिभाने कवितासाठी बरेच सामान खरेदी केले. सामान बरेच आहे हे पाहून विजयने ड्रायव्हरला फोन करून बाजारात बोलावले आणि सामान गडीत ठेऊन त्याला जायला सांगितले. त्यावर प्रतिभा स्वतःशीच म्हणाली काय विचित्र माणूस आहे सामान गाडातून पाठवल आणि आता स्वतः चालत जाणार ! प्रतिभकडे पाहात विजय म्ह्णाला, तू हाच विचार करतेयस ना ? काय विचित्र माणूस अहे सामान गाडीतून पाठवल आणि स्वतः चालत जाणार ! त्यावर प्रतिभच्या चेहर्‍यावरील बदलेले रंग पाहून विजय म्ह्णाला प्रतिभा तू विसरतेयस की मी एक लेखक आहे लोकांचे चेहरे मला वाचता येतात त्यावर प्रतिबा मनात म्ह्णाली मग ! तुंम्हाला हे ही कळले असते की मी तुमच्या प्रेमात पडलेय ? चालता- चालता विजय प्रतिभाला म्ह्णाला, लग्ना बाबत तुझे काय विचार आहेत ? त्यावर किंचित सावरत प्रतिभा म्ह्णाली, मी माझ्या आईच्या आणि बहिणींच्या भविष्याबाबत निश्चिंत झाल्याखेरीज लग्न नाही करणार आणि करायच झालच तर माझ्या घरच्यांची जबाबदारी मलाच उचलण्याची परवानगी त्याने मला द्यायला हवी ! त्यावर विजय तिला म्ह्णाला, समजा तू कोणाच्यातरी प्रेमात पडलीस आणि तो तुझ्या घरच्यांची जबाबदारी उचलण्यास नकार देत असेल तर तू काय करशील ? त्यावर प्रतिभा म्ह्णाली, मी अशा कोणाच्या प्रेमात पडणारच नाही आणि पडलेच तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करेन. मला माझ्या कुटुंबापेक्षा महत्वाचा कोणीच नाही. त्यावर विजय म्ह्णाला हे सारे तू भावनेच्या भरात बोलतेयस वास्तवात असा विचार मुर्खपणा ठरतो. तो मुर्खपणा तू करू नकोस असं मला वाटत. माझा एक मित्र आहे त्याच्याशी मी बोललोय तो तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तो बर्‍यापैकी श्रीमंत आहे तुझ्या घरच्यांची जबाबदारी तो अगदी सहज उचलू शकेल. तुझा होकार असेल तर मी त्याच्याशी पुढच बोलतो ? विजयचे हे बोलणं ऐकून प्रतिभाच्या कोमल हृदयाला असंख्य तडा गेला, ती स्वतःशीच म्ह्णाली, म्ह्णजे सरांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही, मी उगाच त्यांच्या प्रेमात वाहत चालले होते. प्रतिभा स्वतःला सावरत विजयला म्ह्णाली, नको सर मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला समर्थ आहे त्यासाठी मला कोणाच्या उपकाराची गरज नाही. त्यानंतर त्यांच्यात काहीच संवाद झाला नाही. ते माघारी येताच प्रतिभाचा पडलेला चेहरा पाहून कविताने तिला त्याचे कारण विचारले असता ती म्हणाली, तुझ्या दादाने माझ्या लग्नासाठी त्यांच्या मित्राच स्थळ सुचवलयं त्यावर प्रतिभा जोर-जोरात हसायला लागल्यावर प्रतिभा तिला म्ह्णाली इकडे माझा जीव जातोय आणि तू हसतेयसं? त्यावार कविता हसत- हसतच तिला म्ह्णाली असं होयं ! मग काळजी करू नकोस मी माझ्या दादाला चांगलच ओळखते तो कोणाचं लग्न वैगरे जुळविण्याच्या भानगडीत कधीच पडत नाही मुळात त्याला ते आवडतच नाही. मला वाटत त्याने नथीतून तीर चालवला असेल आणि त्या तीराने तू घायाल झालीस! ते ऐकून प्रतिभाच्या जीवात जीव आला खरा पण तरीही ती किंचित अस्वस्थच होती. रात्री जेवताना विजयची आई प्रतिभाच्या हाताला चव आहे हा ! आजची खीर तिनेच बनवली आहे, जीभेवर गोडवा आहे, संस्कारी आणि मनमिळावू आणि प्रेमळ तर आहेच त्यामुळे ज्या घरात सून म्ह्णून जाईल त्या घराचा स्वर्ग करेल त्यावर विजयचे बाबा सहज म्हणाले स्वर्गच करायचा तर आपल्याच घराचा करा ना ? ते ऐकुन प्रतिभाला ठसका लागला विजयने तिच्याकडे पाण्याचा ग्लास पुढे केला आणि बाबांना म्ह्णाला तुंम्हाला या घराचा स्वर्ग करायची जरा जास्तच घाई आहे. त्यावर बाबा काहीच बोलले नाही कविताही काहीच बोलली नाही. दुसर्‍या दिवशी कविताचा हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम ठरला होता कविताने प्रतिभाच्या दोन हातावर आणि प्रतिभाच्या एका हातावर कविताने मेहंदी काढल्यावर कविताच्या एका हातावर मेहंदी कोणी काढायचा हा प्रश्न होता त्यावर आईला विचारले असता आई म्ह्णाली मी बाई नाही काढणार ! विजय काढेल त्याला येते काढता लहानपणी तोच कविताच्या हातावर मेहंदी काढायचा प्रतिभा विजय जवळ गेली आणि त्याच्या मेंहंदीचा कोन देत हात पुढे केला असता विजयने पहिल्यांदा तिचा हात आपल्या हातात घेतला विजयच्या हाताचा स्पर्श पहिल्यांदा अनुभवताना प्रतिभाच्या मनात असंख्य फुलपाखरे उडू लागली होती. विजयने तिचा हात अत्यंत हळुवारपणे आपल्या हातात घेतला होता आणि तो तिच्या हातावर मेहंदी काढू लागला. मेंहदी काढून झाल्यावर ती विजयला गाळात खळी काढत गोड हसत किंचित लाजत थॅन्क यू म्ह्णताच कविता म्ह्णाली, दादा आता सवय करून घे मेहंदी काढायची बायकोच्या हातावर मेहंदी काढणारा नवरा नशिबानेच मिळतो त्यामुळे तुझी बायको काय तुला सोडणार नाही. दुसर्‍या सकाळी प्रतिभा विजयला चहा देताना किंचित ओशाळत होती ते पाहून विजय तिला म्ह्णाला प्रतिभा बस माझ्या समार मला तुझ्याशी थोडी चर्चा करायचेय प्रतिभा बसली असता विजय तिला म्ह्णाला, सॉरी ! मी तुला बाजारातून येताना जे काही माझ्या मित्राबद्दल बोललो ते असंच बोललो माझा असा कोणीही मित्र वैगरे नाही फक्त मला लग्ना बाबत तुझे विचार जाणून घ्यायचे होते ! त्यावर प्रतिभाने पाणावलेल्या डोळ्यांनी का ? असा प्रश्न विचारताच मागून कविता म्ह्णाली, का म्ह्णजे काय त्याला तुझ्याशी लग्न करायचय काय दादा बरोबर ना ? त्यावर विजय अनपेक्षितपणे हो ! म्हटल्यावर प्रतिभासह घरातील सारेच आवाक ! झाले प्रतिभा जागेवरून उटून सरळ आतल्या खोलीत गेल्यावर कविताही तिच्यामागोमाग आतल्या खोलीत गेली असता प्रतिभाने कविताला आपल्या मिठीत भरून घेतली. प्रतिभाचे डोळे अश्रूनी भरले होते. प्रतिभाचे पाणावले डोळे फुसत कविता म्ह्णाली आज मी खूप आनंदी आहे आज माझंच नाही तर माझ्या आई- वडिलांचही एक स्वप्न पुर्ण झाले फक्त तुझ्यामुळे त्यावर प्रतिभा म्ह्णाली, कविता तुझ्यासारखी मैत्रीण भाग्यानेच मिळते, त्यावर प्रतिभा हसून म्ह्णाली, आता मी तुझी नणंद होणार आहे म्ह्टल. विजयने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे विजय आणि प्रतिभाचे नाते अचानक बदलले होते. गावातील टेकडीवरच्या शंकराच्या देवळात विजय प्रतिभा, कविता, आई-बाबा सह गेला असता थोडा एकांत मिळताच प्रतिभाला म्ह्णाला, प्रतिभा मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तुझ्यावर उपकार करण्यासाठी, तु माझ्या बहिणीची मैत्रीण आहेस म्ह्णून, आई-बाबांना सून म्ह्णून आवडलेस म्ह्णून घेतलेला नाही. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्ह्णून घेतला आहे मी जेंव्हा तू शाळेत असताना तुला पहिल्यांदा पाहिले होते तेंव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझा कवितासंग्रह प्रतिभा मी तुलाच डोळ्यासमोर ठेऊन लिहला होता, मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तेंव्हा मी कोणीच नव्हतो पण आजही माझे तुझ्यावरील यकिंचितही आटलेले नव्हते. मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की तू कधी माझ्या आयुष्यात येशीलही, माझा यो-योगांवर विश्वास नाव्हता पण आता विश्वास बसू लागला आहे, योगा-योगाने आपल्या आयुष्यात अनेक घटना क्रमाक्रमाने घडत गेल्या आणि आपण एकमेकांच्या जवळ येण्याचा अवघड मार्ग सोप्पा होत गेला. तु माझ्या आयुष्यात पुन्हा येताच माझ्यातील लेखक कवी मला पुन्हा गवसला , माझ्यातील हरवलेला माणूस आणि कलाकारही पुन्हा जागा झाला, मी पुन्हा माझ्या कुटुंबाच्या जवळ गेलो. तू माझ्या जगण्याला खरा अर्थ दिलास. त्यावर प्रतिभा विजयचा हात हातात घेत त्याला म्ह्णाली मी ही तुमच्या आजच्या रुपाच्या प्रेमात पडले नाही तुमच्या आणि तुमच्या कवितांच्या प्रेमात मी शाळेत असतानाच पडले होते. म्ह्णूनच मी कित्येकदा तुमच्या घराची वारीही केली होती पण योगा-योगानेच तेंव्हा काहीच जमल नाही नंतर सारचं बदलत गेलं तुमची आठवण किंचित मागे पडली, ज्या दिवशी कवितामुळे तुमची ओळख पटली त्या रात्री मी क्षणभरही झोपले नाही. त्या दिवशी पहिल्यांदा माझा योगा-योगांवर आणि प्रेमावरही विश्वास बसला. माझ्या आयुष्यात घडलेल्या सार्‍या चंगल्या – वाईट घटनां संबंध योगा-योगाने आपली जी भेट होणार होती तिच्याशी जोडलेला होता. त्यावर विजय म्हणाला, मी आतापर्यत माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांसाठी इतरांना दोष देत होतो पण आता मला कळतय तो माझा मुर्खपणा होता. आपाल्या आयुष्यात घडणार्‍या सार्‍या घटना एखाद्या चित्रपटात पूर्वनियोजित असल्यासारख्या घडत होत्या मी तर म्ह्णेन या विश्वात असलेली कोणतीतरी अज्ञात शक्तीच ते घडवून आणत होती. आपण मात्र त्याला आज योगा-योग म्ह्णतोय इतकच ! विजयने गप्पा मारत चालताना एक हात प्रतिभाच्या कंबरेभोवती टाकला होता आणि प्रतिभा त्याच्या खांद्यावर डोक टाकून निश्चिंतपणे सावकाश चालत होती त्यांच्या भविष्याच्या दिशेने पण अजूनही त्यांच्या आयुष्यातील योगा – योग संपलेले नव्हते विजय आणि प्रतिभाचं प्रेम यशस्वी होण त्यांचा एकमेकांशी लग्न होण हा एका योगा-योगाचा शेवट होता पण तेथूनच सुरू होणार होता आणखी एक योगायोग….

लेखक – निलेश दत्ताराम बामणे

202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर,
जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com / nileshbamne10@gmail.com

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..