नक्की वाचा 1 मिनिट द्या
पेट्रोल पंपावर गप्प उभे राहून पेट्रोल भरता ,
सोनाराकड़े खाली मान घालून नोटा मोजता,
कदाचित शीतपेयांच्या बाटल्या अजिबात घासाघीस न करता विकत घेता,
हॉटेलमध्ये शिळपाकं अन्न खाऊनही गपगुमान पैसे देता अन वरून टिप पण देता, मग………
घाम गाळून मातीतून मोती पिकवणा-या आमच्या शेतक-याची भाजी विकत घेताना भाव का हो करता ???????
कृतघ्न आहोत का आपण?????
लाज कशी वाटत नाही आपल्याला?????
बाजारात भाजीपाला घेताना कपाळावर अष्टगंध,
गळ्यात माळ व आपल्याकडे भाजीपाला घ्यावा म्हणून आशेने पाहणा-या शेतक-याकडूनच घ्यावा.
कारण भाजीपाला विकण्यासाठी तो बाजारात रणरणत्या उन्हात टोपलं मांडतो ते हौस म्हणून नाही… तर, त्याला पण स्वप्नं असतात.
त्यालाही त्याच्या पोरांना शिकवून तुमच्यासारखं नोकरी धंद्याला लावावंसं वाटते..
आणि त्याचं पोरगंही बाप बाजारातून मला चिवडा व गोडशेव आणेल म्हणून जीभल्या चाटत आतुरतेने वाट पाहत असतं….
आपल्या आजोबांनी, वडिलांनी शेतात कष्ट करून दोन पैसे मिळवल्यामुळेच शिकू शकलो याची जाण ठेवावी.
मूठभर बटाटा चिप्ससाठी 10 रु. अवश्य खर्च करा..
पण
2 रु..ची कोथिंबीर 3 रु. ला झाली म्हणून कृपा करून ओरडू नका.
कारण त्याची बायको भाजी करण्यासाठी तेल मिठाची वाट पाहत असते!
आपली छोटीशी कृती शेतक-याच्या घरी तेल – मीठ पुरवत असते.
सुविचार : जेवण करताना ही प्रार्थना नेहमी करा की, ज्याच्या शेतातून माझ जेवण येते त्यांची मुले कधीच उपाशी झोपु नयेत !
— आपल्या मधालाच एक शेतकर्याचा मुलगा
Leave a Reply