नवीन लेखन...

तरुणवयातील म. गांधीजींचा पुतळा

नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गाच वरदान लाभलेली भूमी असे वर्णन तीच करता येईल. उत्तम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले तलाव आणि नेत्रदिपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडे, वेली, क्षितीजापर्यंत पसरलेली जंगले. त्या जंगलामध्ये साम्राज्य गाजविणारी श्वापदे. बळी तो कान पिळी. ह्या तत्वाने जीवन जगणारे पशू कळपा कळपानी स्वातंत्रपूर्ण जगण्याचा आनंद घेताना दिसत होती. सार बघतांना ह्रदय भरुन येत होत.

जोहानेसबर्ग ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. सारा परिसर सुवर्णमिश्रित दगडांच्या खाणीनी भरलेला. जगातील सर्वांत जास्त खनिज सोन्याचे उत्पादन देणारा हा प्रांत समजला जातो. अतिशय कलात्मक आणि नाविण्यपुर्णतेने वसलेले हे शहर आहे. केवळ शे – दोनशे वर्षाचा इतिहास त्यांच्या वसाहतीचा आहे. थोर जागतिक किर्तीचे नेते नेल्सन मंडेला यांचे वास्तव्य असलेले शहर. त्यानीच द. आफ्रिकेचे प्रथम अध्यक्षपद भूषविलेले होते. जोहानेसबर्ग येथेच भारताचे महान नेते महात्मा गांधीजी यांचे वास्तव्य २१ वर्षे होते. त्यानी गरीब, वर्णभेदामुळे अत्याचार होत असलेल्या जनतेला जाणले. एक लढा दिला. त्यांत ते अशस्वी झाले. पुढे भारतामधील कार्य तर त्याना जागतीक स्थरावर घेऊन गेले. जोहान्सबर्गने गांधीजींची य़ोग्यता, थोरवी जाणली. त्याना अजरामर अशी श्रधांजली अर्पिली.

प्रसंगः-  एक प्रसंग घडला. दक्षिण आफ्रिकेत त्यावेळी वर्णभेद, उचनीचता अतिशय प्रखरतेने मानली जात असे. एकदा ते रेल्वेने प्रवास करीत होते. गांधीजी प्रथम वर्गाच्या बोगीमध्ये रीतसर तिकीट काढून बसले होते. गाडीचा तिकीट तपासनीस तेथे आला. त्याने गांधीजीना त्या डब्यामध्ये बसण्यास हरकत घेतली. गांधीजीनी आपल्या जवळचे नियमाप्रमाणे घेतलेले प्रथम वर्गाचे तिकीट दाखविले. तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो वर्णद्वेष्टा इंग्रज होता. तो तरुण गांधीजीवर खेकसला.

.       ” Black passengers are not allowed to sit in this compartment with white persons ”

असे गांधीजीना ब्ल्याक म्हणत, इंडीयन म्हणत, फॉरीनर्स म्हणत आरोप केले. गांधीजी गोऱ्या लोकांच्या सहवासाठी अयोग्य असल्याचे व्यक्त केले. गांधीजीना हे अत्यंत अपमानकारक वाटले. त्यानी त्याचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. ही वर्ण भेदाची बाब उच्यायुक्ताकडे व त्यावेळच्या सकरारी दरबारांत निदर्शनास आणून देण्याचे सुचविले. त्या उर्मट उद्धट आणि मग्रुर अशा इंग्रज अधिकाऱ्याना जनाची वा मनाची लाज राखली नाही. त्याने गांधीजीना चक्क हात धरुन प्रथम वर्गाच्या डब्यातून खाली उतरुन दिले.

गाधीजीनी Bar-At Law ची पदवी घेतलेली होती. ते साऊथ आफ्रिकेमध्ये २१ वर्षे राहीले. प्रखर देशाभिमान आणि कायद्याचे ज्ञान ह्यामुळे एक वेगळेच व्यक्तीमत्व त्याना प्राप्त झाले होते.

 

कालाय तस्मै नमः  काळाचा महीमा अगाध असतो. ते सत्य आहे. भारतातील अन्याय, वर्णभेद, उच्य-निचता, असत्य, हिंसक वृती, यांच्या विरोधांत गांधीजीनी प्रचंड झगडा दिला. जगभर शक्तीच्या जोरावर राज्य करणाऱ्या इंग्रजाना अहिंसा व सत्य ह्याच्या महामंत्राने भस्मसांत केले. इंग्रजांची जागतिक स्थरावर माघार होत गेली. हाती कोणतेही शस्त्र न घेतांच त्यांनी इंग्रजांचा पराभव केला. गांधीजी महान बनले. त्यांची योग्यता दक्षिण आफ्रिकेतील जनतेने, सरकारने तिव्रतेने जाणली. महात्माजींचा एके काळी त्यांच्याच भूमिवर करण्यांत आलेल्या अपमानाची पश्चातापपूर्ण भरपाई करण्यांत आली. ज्या वयांत गांधीजीनी दक्षिण आफ्रिकेंत वर्णभेद व  उच्यनीचतेला आवाहन दिले, त्याच वयातील ( तिशीतील ) त्यांचा पुतळा जोहान्सबर्ग आणि दरबन  ह्या दोन प्रमुख शहरांत उभारला जाऊन त्या चौकांना गांधी चौक  (Gandhi Square.) हे नामकरण करुन सन्मानित केले.

त्यांचा तारुण्यातील , तिशीच्या जवळपासचा पुतळा, तेजःपुंज चेहरा, उंचपुरा मात्र सडसडीत बांधेसुद अंगकाठी व्यक्त होत होता. वकीली पेहेराव घातलेला, दिसत होता. काळा मोठा कोट परिधान केलेला होता. अंगात सुटबुट टाय शर्ट चमकत होते.

आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा तारुण्यातील भव्य ब्रांझचा पुतळा बघून भाराऊन गेलो. आमचे डोळे आनंदाने, प्रेमाने, अभिमानाने, आणि आदराने भरुन आले. अश्रु स्वयंस्फूर्तीनेच आपली वाट काढीत होते. मन गहीवरुन आले होते.

आम्ही भारतामध्यें महात्मा गांधीजींचे अनेक ठिकाणी, अनेक जागी भव्य दिव्य असे पुतळे बघीतले आहेत. त्यांच्या महान कर्तृत्वाचा, सत्य आणि अहिंसा यांचा मंत्र देत हे सारे पुतळे अजरामर झाल्याचा भास होत असतो. ज्येष्ठत्व-श्रेष्ठत्व यांचे भव्य दर्शन देत, वाकून गेलेले शरीर, हाती काठी, चष्मा, तुरळक केस आणि केवळ पंचा व धोतर हा पेहेराव, मनांत इतका बसला आहे की त्यांची महान भव्यता आणि वेगळेपणा केवळ भारतीयांनांच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मा्यता पावलेले ते एक महान मानव समजले जातात.

जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका येथील शासनाने गांधीजींचा भव्य ब्रॉन्झचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती भागांत स्थापन केला.

चौकाला गांधी चौक  (Gandhi Square.)    हे नामकरण करुण करुन पुतळ्या खालती एक स्तंभ ( शिलालेख ) कोरला होता. तो असा.

 

                        M. K. Gandhi  Attorney at law

 

            Mohandas K. Gandhi was a famous figure at Johannesburg’s first law courts located on Government Square, now renamed Gandhi Square. He kept offices near the law courts from 1903 to 1910, at the corner of Rissik and Anderson Streets, and challenged racially discriminatory enactments, both inside and outside of the courts. Gandhi’s legal work soon merged with his

Satyagraha ( ‘Soul Force ‘ ) movement of passive resistance, putting his legal career behind him. Gandhi dedicated himself to a lifetime of public service.

Gandhi returned to India in 1914 after 21 full and fruitful years in South Africa.

Continuing the search for truth which he had begun in South Africa, he plunged in to India’s struggle for freedom and came to be hailed by his people as  Mahatma, ‘ Great Soul ‘

        

                                          Sculptor :  Tinka Christopher

 

Unveiled by His Worship the Executive Mayor Councillor  Amos  Masondo,

                                               2 October 2003

 

त्याच पुतळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्थंभ ( शिलालेख ) कोरलेला असून त्यावरती त्यावेळचे गांधीजींचे विचार व्यक्त केलेले आहेत.

 

I learn during all those years to love Johannesburg even though ir was a mining camp. It was in Johannesburg that I found my most precious friends. It was in Johannesburg that the foundation for the great struggle of Passive Resistance was

Laid in the September of 1906…

Johannesburg, therefore, had the holiest of all the holy associations that Mrs. Gandhi and I will carry back to India.

M. K. Gandhi, 1914

 

जगातींल सर्वांत श्रीमंत व बलशाली असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री बराक ओबामा हे महात्मा गांधीजीना खूप आदरणीय स्थानावर मानतात. त्यांचे तैलचित्र हे आजही त्यांच्या भव्य कार्यालयांत दिमाखाने जगासमोर आहे.

 

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..