नवीन लेखन...

यंग पॉलिटिशियन

काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्राच्या धावत्या दौर्‍यावर येवून गेलेत. धावत्या दौर्‍यावर म्हणजे अक्षरश: ते धावत धावतच आले अन् त्यांनी चार-दोन उपदेशाचे डोस महाराष्ट्रातल्या युवकांना पाजले, राजकीय नेता म्हणून बिरुद असलेल्या राहुल गांधींनी राजकारणात युवकांनी येण्याचे आवाहन केले, पण असे करतांना त्यांना सध्याच्या राजकीय पक्षातील लोकशाहीवर आसूड ओढण्यासही मागेपुढे पाहिले नाही. स्वत:ची राजकीय प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी राहुल गांधींनी स्वत:च्या काँग्रेस पक्षालाही शाल-जोडीतला अहेर दिला आहे. राहुल गांधी हे गांधी घराण्यातील आणखी एक राजकीय वारसदार म्हणून बघितले जातात, परंतू राहुल गांधींना बहुधा हे लेबल नको आहे व म्हणूनच ते आपल्या खास शैलीत पारंपारिक काँग्रेस पध्दतीपेक्षा वेगळ्या वाटेने आपल्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला तरुण नेतृत्वाची अन् राजकारण्यांची गरज आहे हे निर्विवाद सत्य आहे पण त्याच बरोबर पापल्या क्षेत्रात अनुभवी आणि कुशल व्यक्तींकडे पाठरिवून देखील चालणार नाही. राजकीय अनुभवाच्या बाबतीत राहुल गांधी भलेही परिपक्व नसतील परंतू सध्याच्या काँग्रेसींच्या राजकारणात त्यांना कितपत इंटरेस्ट आहे इथेच शंका येते.

जेष्ठ नेते मनमोहनसिग, प्रणव मुखर्जी, यांना ते ‘मानत ही असतील पण अर्जुनसिग, मणिशंकर अय्यर अशा वादग्रस्त ठरलेल्यांना ते कितपत मानतात हा प्रश्नच आहे. या लोकांच्या ‘राजकारणाचा’ राहूल गांधींना विट आलेला आहे हे अनेकदा त्यांच्या मौनातून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे भविष्यात काँग्रेसला जीवदान मागण्याची वेळ आली तर राहील गांधींचा करिश्मा भलेही पक्षासाठी लाभकारक ठरेल परंतू राहुल गांधी या काँग’ेसवाल्यांमध्ये कसे अॅडजेस्ट होतील हा तर मोठा गंभीर प्रश्न आहे व ह्या गांभीर्याची जाणीव किंबहूना भितीच राहुल गांधींना सतावत असावी म्हणूनच ते तूर्तास सत्तेच्या राजकारणापासून दूर राहात असावेत असे म्हणायला वाव आहे. नुकत्याच महाराष्ट्राच्या दौर्‍यात राहुल गांधींनी राजकारणात तरुणांचा सहभाग वाढला

पाहिजे असे सुतोवाच केले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच ज्या स्थानिक पातळीवरील निवडणुका पार पडल्या त्यात तरुणांनीच बाजी मारली आहे. याचाच अर्थ राजकारणात येण्यास तरुण इच्छूक आहेत असा होतो. पण म्हणून भविष्यात राजकीय चित्र बदललेले दिसेल असे गृहित धरणे घाईचे ठरेल. राहूल गांधींच्या राजकारणात येण्याच्या आवाहनाला तरुण साद देतीलही पण म्हणून राजकीय सद्य प्रवृत्तीत कसा बदल घडून येईल याचाही विचार झाला पाहिजे.

प्राथमिक प्रयोग म्हणून पंतप्रधान मनमोहनसिग यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीमंडळात तरुण मंत्र्यांना सहभागी करुन घेतलेले आहे. आपल्या तरुणाईत राजकारणात प्रवेश करुन व्यवस्थेत योगदान देणार्‍यांमध्ये अनेक चेहरे उदयास आलेले आहेत, यात प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांची नावे घेता येतील, पण देशपातळीवर ज्योतिरादित्य सिघीया, जितीन प्रसाद, सचिन पायलट वगळता अन्य कोणत्याही तरुण नेत्यांची ौज राजकीय वादळात स्थिरावल्याचे दिसून येत नाही. उपरोक्त नावे देखील राजकीय वारसातून पुढे आली आहेत. त्यांच्या राजकारणात येण्याला राजकीय वारस असल्याची पार्श्वभूमि आहे. खुद्द राहुल गांधी यांनी देखील स्वस्त:बद्दल ही गोष्ट कबुल केली आहे. यामुळे राजकीय वारसदार नसलेले तरुण राजकारणात कसे स्थिरावतील हा मोठा प्रश्न आहे. राहूल गांधींना देखील हा प्रश्न सतावत असल्याने त्यांनी ही बाबत आपल्या महारातष्ट्र दौर्‍यात तरुण विद्यार्थ्यांपुढे प्रकट केली. येणाऱ्या काळात राजकीय चित्र बदलण्यासाठी एकट्या राहुल गांधींनी राब-राब राबून चालणार नाही, उदयोन्मुख चेहरे जर राजकारणात बघायचे असतील तर सर्वांगिण प्रयत्न राजकीय पक्षांर्मात झाले पाहिजेत यासाठी सेकंड जनरेशनची संकल्पना रुढ होणे व त्यास मान्यता मिळणे आवश्यक आहे. पण हे नजिकच्या काळात तरी शक्य वाटत नाही. राहूल गांधी हे केवळ आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकावे म्हणून या प्रयत्नात यशस्वी ठरतील एवढे मात्र नक्की.

काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्राच्या धावत्या दौर्‍यावर येवून गेलेत.

— अतुल तांदळीकर

Avatar
About अतुल तांदळीकर 11 Articles
writing is my hobby, jornalisum is my vision. I like reading stories, news articles.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..