नवीन लेखन...

अॅसिडिटी आणि आपल्या खाण्याच्या सवयी

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका

मसालेदार पदार्थ – कधीही सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाऊ नका. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच अल्सरचाही त्रास संभवू शकतो.

सॉफ्ट ड्रिंक – सॉफ्ट ड्रिंक्स कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. यात मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असते. ज्यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो.

थंड पदार्थ – रिकाम्या पोटी चुकूनही थंड पदार्थ खाऊ नका अथवा थंड पेय पिऊ नका. याबदल्यात गरम ग्रीन टी अथवा कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा.

आंबट फळे – सकाळी रिकाम्या पोटी संत्री, लिंबू, पेरु ही फळे खाऊ नका. यामुळे पोटात अॅसिड वाढण्याची शक्यता असते.

कॉफी – तुम्हाला जर रिकाम्या पोटी कॉफी घेण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बंद करा. यामुळे तुम्हाला दिवसभर अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.

— सुषमा मोहिते
Sushama Mohote

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..