नवीन लेखन...

युगपुरुषाचे दर्शन

१९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शन घ्यावे, ही मनांत तीव्र इच्छा होती. परंतु त्यांच्या दिव्य भव्य आणि  महानते पासून माझ्या सारख्या सामान्य विद्यार्थ्यापर्यंतचे  अंतर इतके प्रचंड होते, की त्यांचे केवळ दर्शन मिळणे, ही देखील एक अशक्य गोष्ट होती.  सिद्धार्थ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. कळले की त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आवर्जून उपस्थित राहणार आहेत. मी त्यांना बघण्यासाठी त्या महाविद्यालयात गेलो. एक भव्य  सभागृह भरू लागले. दरवाजावर वा इतर जागी त्याच कॉलेजचे विद्यार्थी सर्व समुदायाला मार्गदर्शन करून योग्य त्या जागेवर बसण्यास मदत करीत होते. त्याच विद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि निमंत्रित यांनाच आत प्रवेश मिळत होता. माझ्याकडे न पास, न मी त्या कॉलेजचा विद्यर्थी. कार्यक्रम  बघण्यात मला तसा फारसा रस नव्हता.  फक्त बघायचे होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. हॉलच्याबाहेरून मी हेरु लागलो. कार्यक्रम हॉलच्या शेजारी एक मोठी खोली होती. तेथेच सोफ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसल्याचे कळले. परंतु स्वयंसेवकाच्या  गराड्यात तेथे जाणे शक्यच नव्हते. काय घडले कुणास माहित.  परंतु माझी आंतरिक ईच्छा इतकी प्रबळ झाली, की मी होऊ शकणाऱ्या भावी परिणामाचा विचार त्या क्षणी न करता, अतिशय  चपळतेने त्या खोलीत शिरलो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर   ह्यांच्या समोर अगदी जवळ गेलो. माझ्या पाठोपाठ दोन स्वयंसेवक  पटकन आत धावून आले. एक विचित्र परिस्थिती. एकाने मला रोखण्यासाठी हात पकडला. समोरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर  असल्यामुळे,  त्याने आपला संताप न दाखवता,  प्रेमाने पाठीवरून  हात फिरवला. व बाहेर जाण्यास सुचविले.     ( माझी त्यावेळी चांगलीच धुलाई झाली असती.)

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बघीतले. मी पटकन म्हंटले ” सर मी शासकीय  विद्यालयाचा विद्यार्थी असल्या कारणाने,  मला  आपल्या कार्यक्रमाला  प्रवेश दिला जात नाही. ”  बाबासाहेबानी क्षणभर मजकडे बघीतले. किंचितसे हास्य केले. ते स्वयंसेवकला म्हणाले  ” ह्याला कार्यक्रमाला  प्रवेश द्या. हा माझा  पाहुणा आहे.”  बस! त्यांचा  आशिर्वाद मिळताच वातावरण एकदम बदलल्याचे मला जाणवले.  मला विद्यार्थ्याच्या समूहामध्ये चांगली जागा मिळाली. संमेलनाचा आनंद काही वेगळाच होता. मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळालेहेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षणपरमपूज बाबासाहेबांचा…. त्या युग पुरुषाचा क्षणिक सहवास.  जीवनामधील सोनेरी क्षण   

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..