नवीन लेखन...

विवोन कोमे दुसऱ्या महायुद्धातिल स्त्री गुप्तहेर

विवोन  कोमेचा जन्म .१८ नोव्हेंबर १९०९ मध्ये शांघाय चीन येथे झाला. तिचे कोडनेम होते अनेट. तिचे वडील बेल्जियमी व आई स्कॉटिश होती. तिचे शिक्षण बेल्जियम व स्कॉटलंड येथे झाले. १९३७  मध्ये तिचे चार्ली कोमेशी लग्न झाले तो रायफल ब्रिगेड मध्ये काम करत होता. पण १९४० मध्ये जखमी झाल्याने त्याला बाहेर पडावे लागले. पुढे तो लंडन मधील बॉम्ब वर्षावमध्ये मारला गेला पण विवोन  सुदैवाने वाचली. तिने आता नवऱ्याची जागा घ्यायचे ठरवले.

नोव्हेंबर १९४१ ला  वुमन एयर फोर्स मध्ये अडमीनिस्ट्रेटर म्हणून दाखला घेतला. १५ फेब्रुवारी १९४३ ला वायरलेस ऑपरेटर म्हणून काम पाहू लागली. पुढे तिला  फ्लाइट ऑफिसर म्हणून बढती मिळाली. २२ ऑगस्ट १९४३ ला तिला सेंट अॅंटीनो येथे पॅरॅशूट मधून उतरवण्यात आले.ती बावीस रिवह्ओलवर घेऊन आली.  तिथे तिला वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करायचे होते. आपण चुकून शत्रूच्या हाती सापडलो तर खाण्यासाठी सायनाईडची गोळी  घेण्यास नकार दिला.ती तरबेज वायरलेस ऑपरेटर होती एका मिनिटांत १८ ते २२ शब्द भाषांतरित करायची तिची क्षमता. होती. वायरलेस मशीन वीज किंवा बॅटरि वर चालत असे. तिने  बॅटरि पसंद केली. कारण ज्या खेड्यातून ती काम करी तिथे वीज नसे व तिला वाटे की बॅटरी मूळ्ये  जर्मनांना संदेश पकडणे कठीण जाईल. ती मशीन साठी लागणारे क्रिस्टल व कोड वेगळ्या सुटकेस मधून घेऊन जात असे. ती कोड पॅड पेक्षा रेशमी रुमालावर लिहिणे पसंद करी. त्या साठी एसओई ने तिला हलके मशीन दिले. सुरक्षेचा उपाय म्हणून ती मशीन २० मिनिटापेक्षा जास्त वेळ वापरत नसे.

पहिले काही महीने ती फ्रांस मध्ये होती. आठवड्यात तिला तीनदा कोडिंग व डीकोडिंग करावे लागे.तिच्या व तिला ज्यांनी  शरण दिले आहे त्यांच्या  सुरक्षतेसाठी ती सतत जागा बदलत असे.काम करताना ती पॅरॅशूट उतरवता येईल अश्या जागा शोधत असे. जर्मन सैनिकांनी अडवले तर आपण नर्स असल्याचे ती बतावणी करी. एका साथीदारांने धोका दिल्याने ती जवळजवळ पकडली गेली होती. तिने सांगितलेल्या बतावणी व दिलेल्या खोट्या कागदपत्रामुळे ती वाचली. तिने लंडनला ४०० पेक्षा जास्त संदेश पाठवले. अनेकवेळा शस्त्र टाकण्यासाठी जागा शोधल्या. जून १९४४ मध्ये जर्मनांनी तिच्या पायावर गोळ्या झाडल्या. पण मशीन घेऊन पळण्यात ती यशस्वी झाली. तिचे रक्ताने माखलेले कपडे लंडनमधील म्युझियम मध्ये कायमचे ठेवण्यात आले. २५ डिसेंबर १९९७ रोजी वयाच्या ८८ व्या  वर्षी तिचा मृत्यू झाला.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..