नवीन लेखन...

विवोन फोनटेन दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

विवोन फोनटेनचा जन्म 8 ऑगस्त 1913 ला फ्रांस मध्ये झाला. तिने हळूहळू 1943 मध्ये जर्मन काबिज फ्रांस मधील क्रांतिकारकारकाना मदत करायला सुरुवात केली.जेव्हा एसओई गुप्तहेर संघटनेचे दोन हेर डेनीस आणि बेनजामीन एसओई संघटनेसाठी घातपाती कारवायांसाठी ट्रॉय शहरात आले. बेनजामीन फोनटेन ला भेटला व त्याने तिला कुरियर म्हणून 2  हजार फ्रँक पगारावर ठेवले. आणि नेनेट सांकेतिक नाव  दिले. ती संदेश नेऊ लागली व फ्रान्सच्या उत्तरपूर्व भागात घातपाती साहित्य पोहोचवू लागली. त्यात त्याना यश येऊ लागले. 4 जुलै ला त्यानी जर्मनांची 6  गाडीची इंजिने उद्ध्वस्त केली.फोनटेन ने 18 जखमी  अमेरिकन वैमानिकांना स्विसमध्ये पळून जायला मदत केली. 1943 साली  जर्मनांनी फ्रांस मध्ये घुसखोरी करून एसओई गुप्तचर संस्थेच नेटवर्क उधवस्थ केले.सप्टेंबर  1943 ते नोव्हेंबर 1943 मध्ये एसओई गुप्तचर संस्थेचे सगळे हेर इंग्लंड मध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले.

फोनटेनने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला.व प्रशिक्षण घेतले. तिथून ती फ्रांसला परतली.तिथे ती पुन्हा एसओई संघटनेच्या हेराना मिळाली. तिने आपले सांकेतिक नाव मीमी असे घेतले. कुरियरचे काम करण्याबरोबर तिने फ्रांस हेराना विमानातून शस्त्र उतरवण्यासाठी गुप्त जागा शोधल्या. ती पॅरॅशूटने उतरलेल्या फ्रांस हेराना भेटली. दोस्त राष्टरणी जर्मनव्याप्त फ्रांसमध्ये आक्रमण केले.आणि जर्मनांची अनेक गोदामे उद्ध्वस्त केली. यात फोनटेनची खूप मदत झाली. .पुढे कार्यकर्त्यापैकी ती एकटी वाचली बाकीचे मारले गेले.

ऑगस्त 1944 पर्यन्त तो जर्मनांच्या ताब्यातून मुक्त होई पर्यन्त ती एकटी लढली.16 सप्टेंबर 1944 ला ती इंग्लंडला गेली. एसओईला दिलेल्या रिपोर्टमध्ये तीने साथीदार मारल्याबद्दल कडवट टिका केली. लंडन मध्ये ती एसओईच्या आपल्या दोन साथीदारासोबत राहिली. त्यानीही एसऑईवर टिका केली. त्यामुळे तिला एसओई कडून कधीही अधिकृत मान्यता मिळाली नाही. महायुद्ध संपल्यावर तिने ड्यूपोंट या फ्रेंच माणसाशी लग्न केले. 9 मे 1996 ला तिचा मृत्यू झाला.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..