नवीन लेखन...

झेरॉक्स मशिन

पूर्वीच्या काळी कार्बन पेपरला फार महत्त्व होते. दोन कोऱ्या कागदांच्या मधे हा कार्बन घालून वरच्या कागदावर लिहिले, की तोच मजकूर खालच्या कागदावर उमटत असे. त्यालाच आपण कार्बन कॉपी म्हणायचो, पण आता ही कार्बन कॉपी पूर्णपणे नामशेष झाली आहे, कारण झेरॉक्स प्रतींमुळे आपण लिहिलेल्या किंवा कुठल्याही मजकुराच्या कितीही झेरॉक्स आपण काढू शकतो. त्यांना फोटो कॉपी असेही म्हणतात.

तर हे सगळे शक्य झाले ते झेरॉक्स मशिनमुळे. आता तर या झेरॉक्स मशिनमध्ये बरीच प्रगती झाली असून पुस्तकेच्या पुस्तके त्यावर झेरॉक्स करता येतात. रंगीत फोटो किंवा मजकुराच्या झेरॉक्सही काढून मिळतात. झेरॉक्स मशिनला फोटो कॉपीयर म्हणतात. आधुनिक झेरॉक्स मशिनमध्ये झेरोग्राफी हे तंत्रज्ञान वापरलेले असते, ज्यात शुष्क प्रक्रिया वापरली जाते व उष्णतेचा वापर केला जातो. यात इंकजेट हे दुसरे एक तंत्र आहे. खरेतर पहिले कॉपिंग यंत्र जेम्स वॅटने १७७९ मध्ये तयार केले होते. विजेचा वापर करून १९३७ मध्ये बल्गेरियाच्या जॉर्जी नदजाकोव याने कॉपिंग मशिन तयार केले. झेरॉक्स मशिनचा शोध मात्र अमेरिकेच्या चेस्टर कार्लसन याने लावला. तो कायद्याचा विद्यार्थी असूनही इलेक्ट्रोस्टॅटिक ऊर्जा वापरून हे यंत्र बनवले.

झेरॉक्स कॉर्पोरेशनने १९५० मध्ये त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. त्या कंपनीच्या नावावरून पुढे या यंत्राला झेरॉक्स असे नाव पडले. झेरोग्राफी हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ ड्राय रायटिंग असा होतो. या यंत्रात सिलिंडरसारख्या ड्रममध्ये चार्जिंगची व्यवस्था असते. त्यात प्रकाशसंवाहक असलेले अर्धवाहक पदार्थ असतात, तसेच चार्ज रोलर असतो. एक्सपोजर विभागात एक प्रखर दिवा त्या कागदावर प्रकाश पाडतो. पांढऱ्या भागावरून प्रकाश परावर्तित होतो, तर लिहिलेल्या मजकुराचा भाग प्रकाश परावर्तित करत नाही, त्यातून कागदाची विद्युतीय प्रतिमा ड्रममध्ये तयार होते. टोनर हा धनभारित असतो, तो ऋणभारित म्हणजे काळ्या भागाकडे आकर्षित होतो, ड्रमवर जी टोनर प्रतिमा तयार होते ती नंतर ती कागदावर घेतली जाते. फ्युजिंग तंत्राने टोनर वितळवून तो उष्णतेने कागदावर बसवला जातो व प्रेशर रोलर वापरले जातात. आजच्या डिजिटल कॉपीयर यंत्रात ही पद्धत वापरली जाते. १९७३ मध्ये कॅनन कंपनीने पहिला रंगीत इलेक्ट्रोस्टॅटिक कलर कॉपीयर बाजारात आणला. डिजिटल कॉपीयरमध्ये एका कागदाच्या १० प्रती काढायच्या असतील तर तो कागद दहा वेळा स्कॅन केला जात नाही, तर एकदाच त्याची प्रतिमा घेऊन केवळ यंत्रावर दहा आकडा दिल्यास दहा प्रती निघतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..