नवीन लेखन...

झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

शालेय जीवनामध्ये मनुष्याच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आहेत असे शिकवले जायचे. आज त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याही पेक्षा अधिक खूप काही मिळवण्यासाठी मनुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेगवान होत आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृतीचा इतका प्रभाव आजच्या पिढीवर पडला आहे की रात्रिचा दिवस करून धनवान बनण्याची स्वप्न साकारू पाहत आहे. हे सर्व करताना निसर्गाशी ताळमेळ तुटत चालला आहे याची मात्र खंत वाटते.

वेळेच चक्र तोडू पाहणारा मानव आज प्रगति नाही परंतु स्वतःचे नुकसान करत आहे. लवकर झोपून लवकर उठण्याची सवय मोडून उशिरा झोपा आणि उशिरा उठा हे जणू काही ब्रीद वाक्यच बनले आहे. झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी दिवसा दरम्यान झालेली शरीराची झीज भरून काढते. शरीराचा थकवा घालवण्याची, रिफ्रेश होण्यासाठी रात्रीची झोप ही खूप आवश्यक आहे. म्हणूनच निसर्गाने रात्र आराम करण्यासाठी बनवली आहे. संध्याकाळ झाली की सर्व पशु, पक्षी आप आपल्या घरट्याकडे धाव घेतात. प्रत्येकाला त्याची आवश्यकता आहे. परंतु आज झोप न लागण्याचा आजार वाढत चालला आहे. चिंता, तणाव, दुःख ह्या सर्वांचा आपल्या झोपेवर परिणाम होत आहे. तुम्ही मनोरुग्णांना बघितलंच असेल. ज्यांना डिप्रेशनचा रोग जडला आहे ते अधिक खाताना आणि अधिक झोपताना दिसतात किंवा त्या उलट भूक न लागणे व झोप न येणे हि निशाणी सुद्धा दिसून येते. मनामध्ये विचारांचे चक्र इतके वेगाने फिरते कि झोप न आल्यामुळे बेचैन होत राहतात.

अमेरिका सारख्या प्रगत देशामध्ये काही वर्षांपूर्वी एका मोठ्या औषध निर्मिती कंपनीच्या उपाध्यक्षांनी सांगितले कि सुमारे दररोज नऊ कोटी झोपेच्या गोळ्या विकल्या जातात. ही आकडेवारी कदाचित आज वाढली सुद्धा असेल. माणूस आपली झोपण्याची कला ही आज गमावून बसला आहे, जी काही वर्षांपूर्वी खूप स्वाभाविक रित्या यायची. एखादे लहान मुलं निश्चिन्त झोपलेले बघितले कि चांगले वाटते पण मोठे झाल्यावर वेगवेगळ्या परिस्थितींच्या चाकोऱ्यात सापडल्यावर मात्र ही झोप उडून जाते. झोप न येण्याचे कारण आहे ताणतणाव. जबाबदाऱ्या, इच्छा, अपेक्षा ह्या सर्वांमुळे आज एका पाठोपाठ एक काम दिसू लागते. व्यक्ति यंत्रासारखा धावत आहे आणि त्याही पेक्षा वेगवान त्याचे विचार.

खेदाची बाब तर ही आहे की आज आपण तनाने जिथे उपस्थित असतो तिथे मनाने कधीच नसतो. घरी असले तर ऑफीसचे विचार आणि ऑफीसमध्ये असले तर घरातले विचार. सवयच लावली आहे की जिथे आहोत तिथे न राहता दुसऱ्याचा विचार करणे. ह्या सवयीमुळेच कधी काळी साखर झोप घेणारा मनुष्य झोप काय असते हे विसरत चालला आहे. एखादे यंत्र सुद्धा सलग काम केल्यानंतर गरम होते. काही वेळासाठी त्याला थंड करणे आवश्यक असते तसेच सतत मनाने धावत असलेला मनुष्य आपण तणावाने गरम होत आहोत, आता तरी विचारांचे चक्र बंद करू या हा इशारा ही समजत नाही. अशी केविलवाणी अवस्था करणारे आपणच आहोत. ‘ चला थोडा आराम करू या ’ हे स्वतःलाच समजवायची आवश्यकता आहे. प्रत्येक मशीन मध्ये ती गरम झाली की तिला थंड करण्यासाठी एक छोटा पंखा बसवला जातो तसेच आपण ही जाणीवपूर्वक ह्या शरीररूपी मशीनला थंड करण्यासाठी सुखद व श्रेष्ठ विचारांचा पंखा चालवावा.

आपल्या विचारांमध्ये इतकी शक्ति आहे की ती शरीराला गरम ही करू शकते तर थंड ही . विचारांचे चक्र हळूहळू शांत करा. दिवसभरात तीन-चार वेळा स्वतःला शांत करायची सवय लावा. हीच सवय तुम्हाला रात्री सुखद अनुभव करून देईल. विचारांना शांत करण्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या ईश्वरावर सोपवून निवांत झोपी जा कारण हे सत्य आहे की प्रत्येक परिस्थितीचा मार्ग दाखवणारा तोच आहे. ज्या गोष्टी आपल्यावर निर्भर आहेत, त्यांना पार पाडण्याची ताकद देणाराही तोच आहे. त्याच्या शक्तिंवर तसेच मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास ठेवा. रोजच्या कामामध्ये जिथे दुविधा किंवा अडचण जाणवते तिथे त्या ईश्वराशी संवाद साधण्याची कला जोपासा. अनुभव कराल कि तो किती सहज रित्या आपल्याला मार्ग दाखवतोय.

मनुष्य जीवन खूप सुंदर आहे. परिस्थितीच्या प्रवाहामध्ये वाहून न जाता, स्वतःच्या शक्तिंवर, ईश्वरीय योजनांवर विश्वास ठेवून निश्चिन्त जगायला शिका. शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य ठीक राहावे ह्यावर लक्ष ठेवा कारण हीच आपलो सर्वात महत्वाची संपत्ति

— ब्रह्माकुमारी नीता 

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

1 Comment on झोप – एक नैसर्गिक प्रक्रिया

  1. खूप उपयुक्त माहिती आहे.सोप्या आणि सरळ शब्दात दिली.खूप खूप आभार

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..