बाराबती किल्ला
ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले. सन १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.
ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले. सन १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.
कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स […]
गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे १९५० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे स्वरुप संलग्न व अध्यापनात्मक आहे. एकही घटक महाविद्यालय नसलेले राज्यातील हे एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा सर्व प्रशासकीय कारभार हा कुलसचिवांकडे असून […]
पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग शहरात कोरोनेशन ब्रिज आहे. या ब्रिजला सवोके ब्रिज म्हणूनही ओळखले जाते. तिस्ता नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या पूलाच्या बांधकामास १९३७ मध्ये किंग जॉर्ज सहावे यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये […]
मेघालयातील मासिनराम या शहरात सर्वाधिक पाऊस होतो. मासिनराम येथे १२२१ मि.मी तर चेरापुंजीला त्या खालोखाल म्हणजेच १०१२ मि.मी पाऊस होतो. येथील उंचावरुन पडणारा पाऊस मनोहारी असतो.
साबरमती नदीच्या पश्चिम किनार्यावर गांधीनगर हे शहर वसले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ गांधीनगरचे नामकरण करण्यात आले. चंदीगढनंतर गांधीनगर हे दुसरे नियोजित शहर असून, १९६६ मध्ये गुजरातची राजधानी अहमदाबादहून गांधीनगर करण्यात आली. स्वामीनारायण संप्रदायाचे […]
आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.
बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे. १५ व्या शतकात चंद्रवंशी राजा भिवेंद्रसिंह यांनी हे मंदिर बांधले. छट हा येथील प्रमुख उत्सव आहे.
जपानमधील टोकिया आणि आमोरी या शहरादरम्यान हायबुसा म्हणजे बहिरी ससाणा ही जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन धावते. ही बुलेट ट्रेन तासाला ५०० कि. मी. वेगाने अंतर कापते.
विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions