ऐतिहासिक शहर अलिबाग
अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत. […]
अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत. […]
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे शहर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. अनेक छोटे-मोठे धबधबे या ठिकाणी पहायला मिळतात. इगतपुरी शहर मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १३० किमी वर आहे. समुद्र सपाटीपासून या शहराची उंची सुमारे १९०० फूट आहे. ज्याप्रमाणे खंडाळा घाट ओलांडल्यावर खंडाळा लागते त्याचप्रमाणे कसारा घाट ओलांडल्यावर इगतपुरी शहर लागते. इगतपुरी आणि खंडाळा साधारणपणे एकाच उंचीवर आहेत. इगतपुरी गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी असलेले विपश्यना केंद्र शहराचे खास आकर्षण आहे. येथे देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक विपश्यनेसाठी येतात. […]
नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दरवर्षी येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते.
महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी […]
जव्हार हे छोटेखानी शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डहाणू- नाशिक मार्गावर वसले आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे शहर प्रसिध्द आहे. आता नवीन निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारचा समावेश झाला आहे. १४ व्या शतकापासून जव्हार राजगादीचे स्थान […]
महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ […]
एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे. अत्यंत कठीण आणि खडतर भागातून या रेल्वेमार्गाची ऊभारणी करण्यात आली. यासाठी प्रथमच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या प्रमुकपदी ई. श्रीधरन नावाचे अत्यंत कायर्क्षम अधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंत्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलले आणि मुंबईपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग सुरु झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाचही जिल्हातून जाणार्या कोकण रेल्वेचे […]
मुंबईच्या समुद्र किनार्यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो. युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा घोषित केले आहे.::
मुंबईला मोठा सागरीकिनारा लाभला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्रि सोसायटीचे मिलार्ड यांनी १९२३ मध्ये मत्स्य संशोधन केंद्राची संकल्पना मांडली डी.बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या २ लाख रुपयांच्या देणगीतून १०८ फूट लांब व ९४ फूट रुंद अशी इमारत […]
पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. पर्वती टेकडी आणि त्यावरील […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions