माचीस उद्योगाचे धुबुरीनगर
पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.
पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.
मध्येप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने ४ पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इटियाडोह धरण व नवेगाव राष्टीय उद्यान या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.
व्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे. त्याच्या दक्षिण-पश्चिमेला कॅट बा […]
१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.
दक्षिण प्रशांत बेटावर नौरु येथे सर्वात जास्त लट्ठ माणसं राहतात. येथे ९५ टक्के माणसं लठ्ठ आहेत. शारीरिक निर्देंशांकानुसार येथे २५ वर्षे वयोगटात लठ्ठपणा वाढत आहे. येथील मुख्य आहार फळ आणि मासे आहे.
फिलीपाईन्समधील हा सस्तन प्राणी ‘फिलीपाईन्स ईगल’ म्हणून याची ओळख असून वजन १ ते १.७ किलो ग्रॅम व लांबी १४ ते १७ इंच आहे. हा शाकाहारी प्राणी आपल्या खाद्यासाठी १०० मीटर उडू शकतो.
भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती.
रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे. कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.
जगात अणूवीज प्रकल्पांत फ्रान्स आघाडीवर आहे. तेथे ७४.१७ टक्के अणूवीज आहे. जापानमध्ये २९.०२, अमेरिका १९.०६ तर चीन मध्ये १.८ टक्के अणूवीज आहे. भारतात जलविद्युत उत्पादन स्वस्त आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions