महाराष्ट्रामध्ये उद्योगांची वाढ व्हावी, या हेतूने महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. राज्याच्या सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकीकरण व्हावे यासाठी महामंडळ राज्यामध्ये शासनाने संपादन केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक क्षेत्रे स्थापणे व त्यांचा विकास करणे हे कार्य करते. खते, औषधे, ट्रक, स्कूटर, सायकली, घड्याळे, दूध शीतकरणाची इलेक्ट्रॉनिकीय उत्पादने, अन्नपदार्थ, शीतपेये, पशुखाद्ये, ओतशाळा इ. लहानमोठ्या उद्योगधंद्यांची या महामंडळाव्दारे उभारणी केली जाते.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने राज्यात अनेक औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहेत. काही क्षेत्रात आय टी पार्क, बी टी पार्क, वाईन पार्क, टेक्सटाईल पार्क, केमिकल झोन, इलेक्ट्रॉनिक्स झोन आहेत.
गडचिरोली जिल्हा वगळता प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औद्योगिक क्षेत्र उभारण्यात आलेले आहे.
Leave a Reply