गोंदिया जिल्हा हा तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे व येथील धान (भात) गिरण्यांसाठीदेखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. गोंदिया शहर म्हणूनच ‘तांदूळाचे शहर’ असे ओळखले जाते. सुवर्णा, जया इत्यादी जातींचा तांदूळ जिल्ह्यातून मध्यपूर्वेतील देशांना निर्यातही केला जातो. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ७० ते ७५% लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे व जलसिंचनाच्या सोयीही आहेत.
त्यामुळेच भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भातासह तूर व उडीद ही पीके खरीप हंगामात घेतली जातात. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, जवस व हरभरा ही पिके प्रामुख्याने जिल्ह्यात घेतली जातात. जिल्ह्यातील तलावांची संख्या जास्त असल्याने येथे मत्स्यशेती उत्तम चालते. जिल्ह्यात काही प्रमाणात ऊसही घेतला जातो.
Leave a Reply