जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो. केळी उत्पादनाखालोखाल जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत कापसाच्या उत्पादनास विशेष महत्त्व आहे.
जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे २०% क्षेत्र कापसाखाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी मृदा कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जामनेर, चोपडा, एरंडोल, पाचौरे, भुसावळ हे कापसाच्या दृष्टीने महत्त्वाचे तालुके आहेत. जिल्ह्यात अन्नधान्य पिकांमध्ये ज्वारी हे सर्वांत महत्त्वाचे पीक होय. तेलबियांच्या उत्पादनातदेखील हा जिल्हा आघाडीवर आहे. चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल व पारोळे या तालुक्यांमध्ये भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पपई, द्राक्ष,बोरे, मेहरुणची बोरे, चिकु, सिताफळ, लिंबु, कागदी लिंबु, मोसंबी, टरबुज इ. फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्ये पिकांमध्ये हरभरा, तुर, मुग, मटकी, उडिद, चवळी इ. उत्पादन होते.
Leave a Reply