सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. माण, खटाव, फलटण या कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने बाजरीचे पीक घेतले जाते. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय असल्याने येथे उसाचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वाई, सातारा, कर्हाड, पाटण व जावळी या प्रामुख्याने कृष्णेच्या खोर्यातील भागांत जास्त सुपीक जमीन आढळते.
Leave a Reply