उस्मानाबाद जिल्ह्यात रेगूर या भागात अतिशय सुपीक माती आढळते. लाव्हाच्या संचयनातून तयार झाल्याने तिला लाव्हा रसाची काळी मृदा असेही म्हटले जाते. उस्मानाबादमध्ये जिरायत पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सिंचन सुविधांचा विचार करता कूपनलिका (बोअरवेल) आधारीत सिंचनाचे प्रमाण जास्त आहे.
कापसाचे पीक उत्तम येत असल्यामुळे या मातीला कापसाची माती असेही म्हणतात .ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून येथे रब्बी हंगामात घेतली जाणारी ज्वारी (शाळू) विशेष प्रसिद्ध आहे.त्याचप्रमाणे तांदूळ, भुईमूग, उडीद, तूर ही सुध्दा जिल्ह्यातली खरीप पिके असून गहू, हरभरा इथली रब्बी पिके आहेत. ऊसाचे पीकदेखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील पानमळे प्रसिद्ध आहेत.
Hi