वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची पीके असून जिल्ह्यात सर्वत्र ज्वारी व कापूस या पिकांसोबत तुरीचे उत्पादन घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जिल्ह्यातील जवळजवळ एक तृतीयांश क्षेत्र (३३%) कापसाखाली आहे. काही तालुक्यांमध्ये उसाच्या लागवडीचे प्रमाणही वाढत आहे. संत्री व केळी या फळपिकांचे उत्पादनही जिल्ह्यात काही ठिकाणी घेतले जाते.
Leave a Reply