यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे.ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे. जिल्ह्यात ज्वारी, तांदूळ, भुईमूग ही खरीप तर गहू, हरभरा ही रब्बी पिके घेतली जातात. पुसद, उमरखेड व महागाव या तालुक्यात उसाचे पीकही घेतले जाते. येथे काही ठिकाणी द्राक्षांचेही मळे आहेत. राळेगाव, कळंब या भागात संत्र्याच्या व केळीच्या बागा आहेत. लाडखेड, दारव्हा, दिगस व उमरखेड या ठिकाणी विड्याच्या पानांचे मळे आहेत.
Leave a Reply