अहमदनगर आणि जिल्हा यांना इतिहासात स्थान आहे. सहकारक्षेत्र आणि साखर उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे.
अहमदनगर जिल्ह्यात चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा वाहन संशोधन व विकास विभाग, भिंगार छावणी तसेच कारागृह आहे.
१९४२ ते १९४६ च्या दरम्यान अहमदनगरच्या कारागृहात असताना पंडित जवाहरलाल नेहरु यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.
मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.
Leave a Reply