नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.
पुणे-औरंगाबाद हा या जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा राज्यमार्ग असून अहमदनगरला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बस धावली ती १९४८ साली अहमदनगर-पुणे या मार्गावर.
संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना लागणारा विठा घाट व संगमनेरहून पुण्याकडे जाताना लागणारा चंदनापुरी घाट – हे नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट आहेत.
Leave a Reply