अहमदनगर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. ऊस हेदेखील महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.गेल्या काही वर्षांपासुन द्राक्ष, मोसंबी, डाळिंब या फळांचे तसेच सूर्यफुलाचे क्षेत्र व उत्पादन जिल्ह्यात वाढते आहे. जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध असून इतर भागात शेवंतीला मागणी असते. जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी संशोधन केंद्र आहे. बाजरी, भुईमुग, तूर, गहू, करडई, हरभरा, ज्वारी व ऊस ही अहमदनगर जिल्ह्यातली प्रमुख पिकं आहेत.
कृषी दृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे १९६८ साली स्थापन झालेले महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ होय. स्थापनेनंतर राहुरी विद्यापीठाचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. या विद्यापीठाने संशोधन करून वापरात आणलेल्या विविध पिकांच्या जाती राज्यातील शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहेत. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना श्रीरामपूर तालुक्यात लोणी (प्रवरानगर) येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी जून, १९५० मध्ये सुरू केला. तसंच साखर कारखाना संख्येचा विचार करता अहमदनगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*