डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं.
संत गाडगे बाबा यांचे इथले काम म्हणजे या जिल्ह्याला लाभलेली अनमोल अशी देणगी आहे.
जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या संधीही येत आहेत. आकोट येथील सतरंज्या विशेष प्रसिध्द आहेत. अकोला येथे खादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. पातुर तालुक्यात चंदनाचे व सागाचे लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
अकोला जिल्ह्यातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत असे असले तरी तेवढेच त्याचे वैशिष्ट्य नाही.