दिल्ली येथे प्रसिध्द अक्षरधाम हे विशाल मंदिर आहे. हे मंदिर पुरातन नाही पण विशाल असे असून अहमदाबाद येथील स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे. प्रमुख स्वामी यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
दिल्लीतील मंदिर ६ नोव्हेंबर २००५ ला अधिकृतपणे खुले झाले. जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर म्हणून याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. यमुना नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे ३००० स्वयंसेवक व ७००० कारागिरांनी मेहनत घेतली. स्वामिनारायण यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि भारताच्या इतिहासातील प्रसंग या मंदिरावर कोरण्यात आलेले आहेत.
Leave a Reply