आल्बेनिया

आल्बेनिया हा आग्नेय युरोपातील देश आहे. याच्या आग्नेयेस ग्रीस, उत्तरेस माँटेनिग्रो, ईशान्येस कोसोव्हो (सर्बिया) तर पूर्वेस मॅसिडोनिया आहे. या भूसीमांशिवाय याच्या सीमा पश्चिमेला एड्रियाटिक समुद्रास व नैऋत्येस आयोनियन समुद्रास भिडल्या आहेत. तसेच आल्बेनियाच्या पश्चिमेस ओत्रांतोच्या सामुद्रधुनीपलीकडे सुमारे ७२ किमी अंतरावर इटलीचा दक्षिण भाग स्थित आहे.

आल्बेनियामध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. याची राजधानी तिराना येथे असून, देशाच्या ३६,००,००० लोकसंख्येपैकी ६,००,००० लोक तिराना शहरात राहतात. साम्यवादी कालखंडानंतर आल्बेनियाने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून दूरसंचार, वाहतूक, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांसह एकंदरीत अर्थव्यवस्था लक्षणीय प्रगती करीत आहे. सध्या आल्बेनिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपामधील संरक्षण व सहकार संस्था इत्यादी प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. २००९ साली आल्बेनियाने युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर : तिराना
अधिकृत भाषा : आल्बेनियन
स्वातंत्र्य दिवस : नोव्हेंबर २८, इ.स. १९१२ (ऑटोमन साम्राज्यापासून)
राष्ट्रीय चलन : लेक

देश : अल्बानिया
राजधानी : तिराणा
चलन : अल्बानिया लेक


Country : Albania
Capital city : Tirana
Currency : Albanian lek
Calling code : 355
Country Domain : .al

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*