संत गुलाबराव महाराज – प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला. रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. ”मधुराद्वैत’ (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.
संत गाडगेबाबा – महाराष्ट्रात गावोगावी पायी फिरून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगे महाराज यांचे मूळ गाव (शेंडगांव, ता. अंजनगांव-सूर्जी) ह्याच जिल्ह्यात आहे. हेच संत गाडगेबाबांचे जन्मगाव होय.
संत तुकडोजी महाराज – राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज ह्यांचे यावली हे जन्मगाव आहे. मोझरी येथे संत तुकडोजी महाराजांनी १९३५ मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केला. मोझरी येथेच महाराजांचे समाधी स्थान आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख – जुने राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले आणि पं. नेहरू पंतप्रधान असताना मंत्री मंडळात कृषी खाते सांभाळणारे डॉ.पंजाबराव देशमुख हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावचे.
वीर वामनराव उर्फ दादा जोशी – थोर स्वातंत्र्यसैनिक व नाटककार वीर वामनराव उर्फ दादा जोशी हे अमरावती जिल्ह्यातलेच होत. स्वातंत्र्यपूर्व काळात वामनरावांनी क्रांतिकार्यात भाग घेतला. सुमारे १० वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला, नंतर ते महात्मा गांधीजींचे अनुयायी बनले. त्या काळात ”राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ”रणदुंदुभी’ या रुपकात्मक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
गो.नी.दांडेकर – ज्येष्ठ ऐतिहासिक व प्रादेशिक कादंबरीकार गो.नी. (गोपाळ नीळकंठ) दांडेकर यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण परतवाडा (तालुका अचलपूर) येथे झाले होते.
प्रतिभाताई पाटील – भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील ह्यांचे अमरावती येथे निवासस्थान आहे.
Grab this app quick to save https://topspyingapps.com/teensafe/ yourself time and money
Leave a Reply