
नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे तिसरे मोठे शहर असून मुंबई -दिल्ली रेल्वेमार्गावरचे मोठे जंक्शन आहे. भारतीय अन्न महामंडळ, इंडियन ऑईल कॉपेरिशन, भारत पेट्रोलियम व दक्षिण मध्य रेल्वेचे मोठे प्रकल्प या शहरात आहेत. येथून ५ किलोमीटरवर अंकाई, टंकाई हे पुरातन किल्ले आहेत. अंकाई किल्ल्यावर पुरातन शिव मंदिर व प्राचीन गुहा असून, येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय आहे.