जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

राजूर येथील श्री गणेश मंदिर – अनेक श्रध्दास्थाने असणार्‍या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे. जालना जिल्हयातील राजूर हे गणपतीचे पूर्ण पीठ मानले जाते. महाराष्ट्रात मोरगांव, चिंचवड व राजूर ही श्रीगणेशाची […]

जालना जिल्ह्यातील दळणवळण सोयी

जालना जिल्ह्याचे गेल्या काही वर्षात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले आहे. मनमाड-काचीगुडा हा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. जालन्याहून औरंगाबाद, खामगाव, हिंगोली व बीडकडे जाणारे राज्यरस्ते जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देत आहेत.

जालना जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

जिल्ह्यात जालना, परतूर,अंबड, भोकरदन, जाफराबाद व जालना येथे औद्योगिक वसाहती असून,जालना शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. जालना जिल्ह्यात ४ साखर कारखाने आहेत.जालना व आष्टी येथे हातमाग व यंत्रमाग उद्योग चालतो. जालना येथे धातू […]

जालना जिल्ह्याचा इतिहास

छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा […]

जळगाव जिल्हा

पूर्वी खानदेश या नावाने संबोधला जाणारा जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जळगावचे नाव अग्रस्थानी येते. केळी व तेलबियांसाठी आघाडीवर असलेला […]

जळगाव जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. भारतातील १६% केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यातच होत असून, जगातील सर्वाधिक केळ्यांचे उत्पादन करणार्‍या प्रदेशांपैकी हा एक भाग गणला जातो. केळी उत्पादनाखालोखाल जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक […]

जळगाव जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

साने गुरुजी – अतिशय संवेदनशील लेखक, कवी व समाजसुधारक साने गुरुजी हे काही काळ जिल्ह्यातील अंमळनेर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत जळगाव जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी म्हणून प्रसिध्द असलेल, […]

जळगाव जिल्ह्यातील लोकजीवन

जळगाव येथे भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसार‘या आदिवासी जमातीचे लोक राहतात. चोपडा, यावल, व रावेर या तालुक्यांमध्ये हे लोक बहुसंख्येने राहत आहेत. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील बोलली जाते. […]

जळगाव जिल्ह्याची भौगोलिक माहिती

पूर्वी पूर्व खानदेश या नावाने ओळखल्या जाणार्‍या जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० […]

जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. ‘पद्म’ म्‍हणजे कमळ आणि ‘आलय’ म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे […]

1 99 100 101 102 103 112