पेरू

पेरूचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहेत. प्रागैतिहासिक काळापासून ह्या […]

रोमेनिया

रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बिया व हंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर […]

रशिया

रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्याल पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे. असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० […]

रुवांडा

रुवांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. रवांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला काँगो हे देश आहेत. राजधानी व सर्वात मोठे शहर :किगाली अधिकृत भाषा :किन्यारुवांडा, फ्रेंच, इंग्रजी राष्ट्रीय चलन […]

टांझानिया

टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. टांझानियाच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल […]

पूर्व तिमोर

पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो. […]

तैवान

चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे. राजधानी व सर्वात मोठे […]

ताजिकिस्तान

ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून […]

त्रिनिदाद आणि टोबॅगो

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे. इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस […]

ट्युनिसिया

ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग […]

1 9 10 11 12 13 112