ड्युब्रॉनिक

अॅडियाट्रिकचा मोती समजले जाणारे ड्युब्रॉनिक हे शहर क्रोएशियात आहे. या शहराचा शोध सातव्या शतकात लागला रिनायझन्स काळातील सुंदर चर्च. इमारती येथे पहायला मिळतात.

टनेल ऑफ लव्ह

टनेल ऑफ लव्ह हा युक्रेनमधील दोन रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. मात्र, या मार्गावरील झाडांच्या रचनेमुळे तो जगप्रसिध्द झाला आहे. जगभरातील प्रेमीयुगुलांसाठी हा रस्ता महत्वाचे ठिकाण बनले आहे.

चीनमधील माऊंट हुआंगशांग

चीनच्या सांस्कृतिक इतिहासात हुआंगशांग पर्वताला महत्त्वाचे स्थान आहे. चित्रकार, लेखक, कवी यांच्यासाठी हा पर्वत प्रेरणादायी असल्याचे चीनमधील नागरिकांचे मत आहे.      

ऐतिहासिक ब्रिजटाऊन

बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.

सीमरिग रेल्वे

ऑस्ट्रियातील उंच पर्वतीय प्रदेशात उभारण्यात आलेला सीमरिग रेल्वे प्रकल्प हा उत्कृष्ट इंजिनियरिंगचा नमुना आहे. १८४८ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला. याची नोंद जागतिक वारसा यादीत करण्यात आली आहे.

अॅबॉमीतील राजवाडे

बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे. १६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले. ४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.

यिन झू

चीनमधील यिन झू इ.स.पूर्व १३०० या काळात शान राजवटीची राजधानी होती. चीनमधील सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या या शहराचे अनेक अवशेष येथे पहायला मिळतात. हुनाए नदीच्या काठावर हे शहर होते.

स्टॉकलेट हाउस

बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे बांधण्यात आलेले स्टॉकलेट हाउस हे ऑस्ट्रियन वास्तुरचनाकार जोसेफ हॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले. वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

द मदरलॅंड कॉल्स

द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली.

1 27 28 29 30 31 112