महाराष्ट्र राज्याची वार्षिक योजना

राज्याच्या वार्षिक योजनेचे सन २०१३-१४चे आकारमानच्या १०.२ टक्क्यांप्रमाणे ४ हजार ७८७ कोटी ६८ लाख रुपये अनुसूचित जाती उपयोजनेसाठी आणि ८.९ टक्के प्रमाणे ४ हजार१७७ कोटी ४८ लाख रुपये आदिवासी उपयोजनेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

मोनार्च राखीव उद्यान

मेक्सिकोमधील मोनार्च राखीव उद्यानात फुलपाकरांच्या हजारो जाती आढळतात. येथे अनेक जातींची फुलपाखरे प्रजनन काळात जमतात. युनेस्को ने हे ठिकाण जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.

माउंट वेई

दक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. येथे प्राचीन काळातील अनेक मंदिरे, शिलालेख पाहायला मिळतात. पहिल्या शतकातील हान राजवटीच्या खुणा येथे दिसतात.

टेट्रो ऑलिम्पिक थिएटर

उत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.

टेंपल ऑफ हेवन

टेंपल ऑफ हेवन हे मंदिर बीजिंग शहरात आहे. इ.स. १४२० ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मोंग आणि क्विंग या राज्यकर्त्यांचे वारसदार या मंदिरात चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात.

वाळूचे बेट फ्रासर

ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे. या बेटाचा विस्तार १ लाख ८४ हजार हेक्टर उतका आहे. स्फटिकासारख्या सुंदर पाण्याचे तलाव या बेटावर आढळतात.

माउंट वुताई

माउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे. येथे असलेल्या ४० मठांमध्ये बुध्दांच्या ५०० मूर्ती व चित्रांचा समावेश आहे. पाच शिखरांचा डोंगर असेही याला म्हटले जाते.

थोर्स वेल

अमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.

क्युनका

स्पेनमधील क्युनका हे गाव डोंगरातील दगडांवरील विशिष्ट प्रकारच्या घरांसाठी प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात हे गाव वसविण्यात आले. याची रचना आणि त्याचा ऐतिहासिक ठेवा स्पेनने जपला आहे.

एंजेल धबधबा

व्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्‍या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.

1 39 40 41 42 43 112