जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतात. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते.तर कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक आहे.बाजरी,गहू,तूर,मूग, उडीद, तीळ, जवळ, मसुर, सोयाबीन, मिरची, ऊस, कांदा, तेलबीया व इतर भाजीपाला पिकांचा उत्पादनात अग्रेसर ही आहेत. जिल्ह्यातील पाटोदा, बीड, माजलगाव, अंबेजोगाई, केज, शिरूर, आष्टी या तालुक्यात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. बाजरीची शेती प्रामुख्याने पाटोदा, शिरूर, आष्टी, माजलगाव, केज या तालुक्यात केली जाते. भुईमुगाचे उत्पादन आष्टी,अंबेजोगाई, केज प्रामुख्याने येथे होते. कापूस उत्पादनात आष्टी, माजलगाव, बीड व गेवराई तालुके अग्रेसर आहेत.
ऱबी ज्वारीचे उत्पादन आष्टी,केज,माजलगाव,बीड,गेवराई व वडवणी या तालुक्यात उत्पादन घेतले जाते. आष्टी,केज,माजलगाव,बीड,गेवराई या तालुक्यात गव्हाचे उत्पादन होते. आष्टी,पाटोदा,बीड व केज येथे हरभऱ्याचे उत्पादन निघते. करडईची लागवड आष्टी,माजलगाव,गेवराई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. जिल्ह्यात बागायती शेतीसुद्धा थोड्याप्रमाणात होते. ऊसची लागवड आष्टी,बीड,माजलगाव,गेवराई,अंबेजोगाई इत्यादी तालुक्यामध्ये केली जाते. बीड,अंबेजोगाई या तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन होते. गोदावरी व मांजरा या नदयाकाठी कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते. आंबे उत्पादनात आष्टी,बीड,अंबेजोगाई,नेकनुर अग्रेसर आहेत. नेकनुर येथे काला पहाड व अंबेजोगाई येथे पेवंदी हे आंबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय पेरु,मोसंबी,केळी यांचेही उत्पादन घेतले जाते.या जिल्ह्यात २००८ मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार जवळपास साडेदहा लाख जनावरे आहेत. यात साडेसहा लाखांपर्यंत दुधाळ जनावरे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दूधउत्पादन हा शेतक-यांचा मोठया प्रमाणावर जोडधंदा मानला जातो.
pro-essay-writer.com paper writer
Leave a Reply