भंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. उत्तरेकडे सातपुडा पर्वताचा डोंगराळ भाग आहे. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किमी असून एकूण लोकसंख्या ११,३५,८३५ इतकी आहे.वैनगंगा ही जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. भंडा-यात ३,६४८ एवढी लहान तळी आहेत. जिल्ह्याचे हवामान विषम असल्याने तुलनेने येथे चांगला पाऊस पडतो. या जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी सुमारे १५० सें. मी. इतके आहे.
Leave a Reply