कर्नाटक राज्यातील तुमकुर हे एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे बंगलोरपासून अवघ्या ७० किलोमीटरवर असलेल्या या शहरात २८ ऑगस्ट २०१० रोजी कर्नाटक शासनाने महापालिकेची स्थापना केली राष्ट्रीय महामार्ग क्र २०६ वर हे शहर येते तुमकूरला नारळाचे शहर असेही म्हणतात. बंगलोरहून तुमकुरला बसने जाता येते. दक्षिण पश्चिम रेल्वेचे येथे एक स्थानक आहे.
कल्पतरु नाडू नावाने प्रसिध्द
जिल्हा मुख्यालय असलेल्या तुमकुर शहरात मोठ्या प्रमाणात नारळाचे उत्पादन होते. म्हणूनच ते कल्पतरु नाडू या नावानेही ओळखले जाते कृष्णा आणि कावेरी नद्दयांच्या खोर्यात वसलेल्या या निसर्गसंपन्न शहरातील विद्यापीठही देशभर प्रसिध्द आहे.
Leave a Reply