अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, जामखेड व संगमनेर या ठिकाणी महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती असून या ठिकाणी कायनेटिक इंजिनिअरिंग,लार्सन अँड टुर्बो, व्हिडिओकॉन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अँड बेअरिंग्ज, पारस उद्योग, इंडियन सीमलेस, सी.जी.न्यू एज-कमिन्स इंडिया असे प्रमुख उद्योग नगर जिल्ह्यात आहेत. धूत ग्रूपच्या सिमेंट पिशव्या (बॅग्ज) संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कायनेटिकचे फिरोदिया व व्हिडिओकॉनचे धूत हे उद्योजक मूळचे नगरचेच. दीपक आर्ट्स या वैशिष्ट्यपूर्ण उद्योगात सुमारे ५०० कलावंत-कर्मचारी असून, येथे बनलेल्या भेटवस्तू संपूर्ण भारतात पाठवल्या जातात. यांच्या गणेश मूर्तीही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

संगीत क्षेत्रातील साथीची वाद्ये उत्पादित करण्यामध्ये अहमदनगर राज्यात आघाडीवर आहे. प्रामुख्याने चर्मवाद्ये, हार्मोनियम, टाळ-झांज यांची निर्मिती नगरमध्ये केली जाते. वारकरी संप्रदायाच्या भजनात अत्यावश्यक असलेले कासे-पितळ्याचे टाळ सुध्दा येथे तयार होतात. नगरचा कापडबाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यामुळे लग्नसराईच्या काळात येथे ग्राहकांची गर्दी उसळते.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्यातील सर्वांत मोठी बँक मानली जाते. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी १९२३ मध्ये लोणी येथे ‘लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी’ स्थापून केली ही केवळ राज्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली सहकारी पतपेढी मानली जाते.

There will always be https://justdomyhomework.com/ people a little homesick, unprepared, or stressed

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*