जिल्ह्यात चिपळूण, पोफळी, खाडपाडी, खेरडी, लोटेमाळ, रत्नागिरी, जयगड, देवरुख, दापोली, राजापूर याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पावसजवळ फिनोलेक्स ही शेतीसाठी लागणारे पाईप्स तयार करणारी कंपनी आहे. मासेमारी आणि आंबा व आनुषंगिक उत्पादने हे जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहेत. आंब्याचा रस हवाबंद करण्याचा उद्योग चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, येथे मोठ्या प्रमाणात आहे. मासे पकडणे, मत्स्योत्पादने हवाबंद करणे हा उद्योग दाभोळ, हर्णे, रत्नागिरी येथे चालतो. आंबा उत्पादनात महाराष्ट्रात रत्नागिरीचा पहिला क्रमांक लागतो, तर काजू उप्तादनात रत्नागिरी दुसर्या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वात मोठा अँल्यूमिनियम प्रकल्प रत्नागिरी येथे विकसित होत आहे. तसेच रत्नागिरीत नर्मदा सिमेंटचा कारखानाही उभा राहिला आहे. येथे कोकमपासून आमसुल तयार करण्याचा उद्योगही चालतो. कोकम सरबत, आंबा पोळी, नाचणीचे पीठ आदी खास कोकणी उत्पादनांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते. रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे. हे कोकण कृषी विद्यापीठाशी जोडलेले आहे.
Leave a Reply