सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उद्योग

सिंधुदूर्ग जिल्ह्यात सुमारे १२० कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यात एकूण १८ खाड्या आहेत. त्यामुळे स्वाभाविकच मत्स्य व्यवसाय हा येथील एक महत्त्वाचा, आर्थिक प्राप्ती करून देणारा व्यवसाय ठरला आहे.

कुडाळ, सावंतवाडी व कणकवली येथे सहकारी व विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात कोकण गॅस, महाराष्ट्र मिनरल्स, बायमन गार्डन, पावडर मेटल इत्यादी उद्योग उभे राहिले आहेत. काजू बियांपासून काजूगर काढण्याचे अनेक कारखाने आहेत, तसेच आंबे भरण्याच्या पेट्यांचे कारखाने वेंगुर्ला व देवगडला आहेत. वेंगुर्ले, मालवण या ठिकाणी काथ्या बनवण्याचे व काथ्यापासून ब्रश, दोरखंड सारख्या वस्तू बनवण्याचे कारखाने आहेत.

गेल्या तीन शतकांहून अधिक काळ सावंतवाडी हे लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिध्द आहे. यानध्ये लाकडी फळे, गंजिफा यांच्या निर्मितीचेही येथे परंपरागत केंद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीनजीक वस्त्रोद्योगाविषयक तर सावंतवाडीनजीक पर्यटनविषयक विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्याची शासनाची योजना आहे.तसंच
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प देवगड तालुक्यात उभारण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*