सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड
सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट, आणि सर्जेकोट हे होय. सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत. किनार्यावरुन सिंधुदुर्गाकडे पाहील्यास डावीकडे पद्मगड तर उजव्या किनार्याच्या भूशीरावर राजकोट आहे. सर्जेकोट ४ कि.मी. अंतरावर आहे. […]