अहमदनगर या शहराला ५०० वर्षाचा इतिहास आहे. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला होता. १८१७ साली ब्रिटिशांनी जिंकले होते. या शहराला नगर नावानेही ओळखले जाते. सीना नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. किल्ला, रेणुका माता मंदिर, चांदबिबी महल शहराचे वैशिष्ट्य आहे.
अहमदनगर शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वास्तू आहे. या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ती दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. दुसरा सलाबतखान हा चौथा निजाम मूर्तजा याचा वजीर होता. मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखानाची नेमणूक केली होती.
या दुसऱ्या सलाबतखानाने अहमदनगर शहरात खापरी नळातून पाणी आणले.
या कबरीला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
Very good information canbaby Mahal
Very good information