चित्तूर हे केरळ राज्यातल्या पलक्कड जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहरात असलेले दुर्गा मंदिर चित्तूर भगवती नावाने प्रसिद्ध आहे. सोकनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. कोंगनपाडा येथील प्रमुख उत्सव आहे. हा उत्सव मार्च महिन्यात येतो. विविध प्रकारची गाणी गाऊन हा उत्सव साजरा केला जातो.
उत्सवप्रिय चित्तूरवासी
चित्तूरमध्ये राहणारे लोक उत्सवप्रिय असून, वर्षभर येथे अनेक उत्सव साजरे होतात. ओणम, पोंगल, विशू, सुरन पोरु, अय्यप्पन विलकू, निर्मला हे त्यापैकीच काही होत. ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक हजेरी लावतात. त्रिशूर येथून बसने चित्तूरला जाता येते.
Leave a Reply