कोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.
१९७५ साली फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालेला कोमोरोस राजकीय व आर्थिक दृष्ट्या अस्थिर देश असून येथील अर्ध्याहून अधिक जनता आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली राहते.
राजधानी व सर्वात मोठे शहर : मोरोनी
अधिकृत भाषा : कोमोरियन, फ्रेंच, अरबी
स्वातंत्र्य दिवस : जुलै ६, १९७५ (फ्रान्सपासून)
राष्ट्रीय चलन : कोमोरियन फ्रँक
( Source : Wikipedia )
Leave a Reply