चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.
जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे चेक प्रजासत्ताकमध्ये बव्हंश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणार्यांचा समावेश आहे. चेक प्रजासत्ताकमधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.
येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्त्वात नाही.
राजधानी व सर्वात मोठे शहर : प्राग
अधिकृत भाषा : चेक
राष्ट्रीय चलन : चेक कोरुना (CZK)
( Source : Wikipedia )
Leave a Reply