भारतातील दूध उत्पादन

भारतातील दूध उत्पादनात गेल्या २० वर्षात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. १९९१ -९२ मध्ये देशातील दूध उत्पादन ५५.६ दशलक्ष टन इतके होते. २००१-०२ मध्ये ते ८४.४ दशलक्ष टन झाले.

२००६-०७ मध्ये पहिल्यांदाच दूध उत्पादनाने १०० दशलक्ष टनांचा आकडा ओलांडला. त्या वर्षी हे उत्पादन १०२.६ दशलक्ष टन झाले. २०११-१२ मध्ये ते १२७.९ दशलक्ष टनांहून अधिक झाले.

१९९१-९२ मध्ये देशात माणशी प्रतिदिन १७८ ग्रॅम दुधाची उपलब्धता होती. २०११-१२ मध्ये ही उपलब्धता २९१ ग्रॅम इतकी होती.

1 Comment on भारतातील दूध उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published.


*