नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात.
डॅन्यूब ही मध्य युरोपामधील एक प्रमुख व वोल्गाखालोखाल युरोप खंडामधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी जर्मनीमधील बाडेन-व्युर्टेंमबर्ग राज्यातील काळ्या जंगलाच्या डोनाउसिंगेन या गावाजवळ उगम पावते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोवा व युक्रेन ह्या दहा देशांमधून वाहणारी २,८६० किमी लांबीची ही नदी त्रिभुज प्रदेशामध्ये काळ्या समुद्राला मिळते.
काळ्या समुद्राजवळील डॅन्यूब त्रिभूज प्रदेशात पक्ष्यांच्या सुमारे ३०० व माशांच्या ४५ पेक्षा जास्त जाती आढळतात. ३, १२, ४४० हेक्टर परिसरातील या प्रदेशाचा ‘युनेस्को’च्या वारसा यादीत समावेश आहे.
Leave a Reply