पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर देहू हे पुरातन तीर्थक्षेत्र आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ म्हणून देहू प्रसिध्द आहे. देहूपासून ५ किलोमीटर अतरावर असलेल्या भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज चिंतन करीत असल्याची नोंद आहे.
इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले आणि तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरंगले होते. तो डोहसुद्धा इंद्रायणीकाठीच आहे.
देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर इत्यादि स्थळे आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो आणि मोठी यात्रा भरते.
Leave a Reply