धारवाड हे कर्नाटकातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. ते पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शहराशेजारचे हुबळी शहर व धारवाड यांची संयुक्त महापालिका आहे.
धारवाड हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे माहेरघर आहे. संवाई गंधर्व, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांनी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात धारवाडचे नाव अजरामर केले.
प्रसिध्द कथाकार जी.ए. कुलकर्णी हेही याच शहरातील.
हिरवाईने नटलेल्या या शहरातील हवामान खूपच आल्हाददायक आहे. येथील कर्नाटक विद्यापीठात देश -परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.
धारवाडचे पेढे देशभर प्रसिध्द आहेत.
Leave a Reply