धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८०६१ चौ. किमी. इतके आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी आहे. धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे. धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे. जिल्ह्यात तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, बोरी, कान व आरु या महत्वाच्या नद्या आहेत.
Leave a Reply