धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध असलेला धुळे जिल्हा हा तेथील शुद्ध दुधासाठी भारतभर प्रसिध्द आहे. धुळे जिल्ह्यातील या शुध्द दुधाला महाराष्ट्राबाहेरही चांगली मागणी आहे. भुईमुगाचे अधिक क्षेत्र व उत्पादन असणारा जिल्हा, बहुसंख्येने आदिवासी जमातींचे वास्तव्य, अहिराणी / खानदेशी भाषेचा वापर, व पवन उर्जेची वाढती निर्मिती या जिल्ह्याची अशी अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्ये सांगता येतील.