एलुरु हे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ वर ते वसले आहे. हैदराबादपासून या शहराचे अंतर ३३३ कि.मी. असून, या शहराचे पूर्वीचे नाव ‘हेलापुरी’ असे होते. उन्हाळ्याच्या दिवसात येथील तापमान उच्च व हवामान कोरडे असते.
उलनचे कारपेट प्रसिद्ध
कोलेरू नावाच्या एका मोठ्या तलावाकाठी वसलेल्या एलुरु शहरातून तमिलेरु नावाची नदी वाहते. या शहरात बनवले जाणारे पर्शियन पद्धतीचे उलनचे कारपेट प्रसिद्ध आहे. या कारपेटची विदेशातही निर्यात केली जाते.
Leave a Reply